भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर पुढील महिन्यात पुन्हा एकदा भारताची निळी जर्सी परिधान करताना दिसणार आहे. मात्र, यावेळी तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दोन वेळा विश्वचषक विजेत्या कर्णधाराला बीसीसीआयने टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमले होते.
मंगळवारी (२९ सप्टेंबर) धोनीच्या समावेशावर बोलताना बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, संघांमध्ये धोनीसारख्या अनुभवी व्यक्तीच्या उपस्थितीचा भारताला नक्कीच फायदा होईल.
ते पुढे म्हणाले ‘धोनी एक महान कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी -२० विश्वचषक, २०१० आणि २०१६ आशिया चषक, २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. हा एक अद्भुत विक्रम आहेत. आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी संघात धोनीचे मार्गदर्शक म्हणून असणे ही खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे.’
धुमाळ पुढे म्हणाले, ‘धोनीची संघात चांगली प्रतिष्ठा आणि आदर आहे. त्याला संघात आणणे याचा अर्थ कोणालाही कमी लेखणे असे नाही. त्याने आजपर्यंत भारतीय संघासाठी चांगले काम केले आहे.’
मुळात टी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० मध्ये होणार होती. पण, कोविडच्या महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या स्पर्धा हलवण्यात आल्या. मस्कत, दुबई, अबू धाबी आणि शारजाह अशा एकूण चार ठिकाणी या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतील.
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने टी -२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय, स्वतःचा आहे की बीसीसीआयने त्याला भाग पाडले आहे, असे विचारले असता धुमाळ म्हणाले, ‘बोर्डाने त्याला पद सोडण्यास सांगितले नाही. हा पूर्णपणे त्याचा स्वतःचा निर्णय होता. आम्ही त्याला असे करण्यास का सांगू? तो खूप छान काम करत होता.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ गेम चेंगिंग ओव्हरनंतर आली पोलार्डची प्रतिक्रिया, म्हणाला…
“टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व देश पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी त्यांच्या मागे धावतील”