भारतीय क्रिकेट संघाचा सर्वकालीन महान अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. युवराजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची खबर चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. आणि ती गुड न्यूज म्हणजे युवराज आणि त्याची पत्नी हेजल हे दोघेही जोडपे आता पालक म्हणजेच आई-बाबा बनले आहेत. (Hazel Keech and Yuvraj Singh)
❤️ @hazelkeech pic.twitter.com/IK6BnOgfBe
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) January 25, 2022
युवराज सिंग याने दिलेल्या पोस्टमध्ये, “आमच्या सर्व चाहते, मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांस, आज देवाने आम्हाला चिमुकल्या मुलाच्या रूपात आशीर्वाद दिला आहे. आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत आणि सर्वांना विनंती करतो की, चिमुकल्याचे या जगात स्वागत करत असताना आमच्या गोपनीयतेचा आदर करावा” असे युवराजने पोस्टमध्ये म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CW5GMSFD5gd/?utm_medium=copy_link
युवराजसिंग याच्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे युवराज आणि हेजल हे दोघे आईबाप झाले असून, त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तसेच, त्यांनी याकाळात गोपनीयता ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.
युवराज सिंग आणि हेजल किच या दोघांनी २०१६ मध्ये कुटुंबियांच्या आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. हेजल ही मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात होती. तिने काही बॉलिवूड चित्रपटात कामही केले आहे.
युवराज सिंगची कारकिर्द
साल २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला युवराज सिंगने भारताला अनेकदा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. तो २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. इतकंच नव्हे, तर युवराजने २००० साली १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून देखील विश्वचषक जिंकला आहे.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०४ वनडे, ४० कसोटी आणि ५८ टी२० असे मिळून एकूण ४०२ सामने खेळले. यामध्ये मिळून त्याने ११७७८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“ज्याने कर्नाटकचे नेतृत्व केले नाही त्याला भारताचा कर्णधार केले”
झुंजार पुनरागमनासह तेलगू टायटन्सने खेळला टाय! हरियाणा स्टीलर्स तिसऱ्या स्थानी
सहावीत असताना पाहिलेले स्वप्न बवुमा पूर्ण करतोय; वाचा ती प्रेरणादायी कहाणी
व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा