नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय यष्टीरक्षकांनी उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात एमएस धोनी आणि रिषभ पंत यांच्यात तुलनाही होत आहे.
पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी डेली टेलिग्राफशी बोलताना ‘पंत या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघसहकाऱ्याशी कमी धोनीशीच सर्वाधिक बोलला असेल’ असा खुलासा त्यांनी पंतच्या बाबतीत केला आहे.
“धोनी हा पंतचा आदर्श आहे. सल्ले घेण्यासाठी तो नेहमी धोनीसोबत फोनवर बोलताना दिसतो. माझ्या मते कसोटी मालिकेवेळीही त्याने धोनीशी संवाद साधला असेल”, असे शास्त्री म्हणाले.
“मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, असेही शास्त्री पुढे म्हणाले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नवख्या रिषभ पंतने टी20 आणि कसोटी मालिकेत एमएस धोनीच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. तर धोनीने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत सलग तीन अर्धशतके केली. शेवटच्या आणि निर्णायक वन-डे सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण 87 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: म्हणून रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडूच नाही तर व्यक्ती देखील आहे
–या संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने
–न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकासाठी अशी आहे टीम इंडिया