अलीकडेच आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी संघ निवडीवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अशात भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. तो म्हणाला की, अष्टपैलू शिवम दुबे याला हार्दिक पंड्या याच्या बॅकअप खेळाडूच्या रूपात आशिया चषकासाठी निवडलेल्या संघात घ्यायला पाहिजे होते. दुबे सध्या आयर्लंडमध्ये जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखालील 3 सामन्यांची टी20 मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. दुबेची आयपीएलमधील कामगिरी पाहून गंभीरने असे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाला गंभीर?
माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वातील निवड समितीला आशिया चषकासाठी शिवम दुबे (Shivam Dubey) याच्या नावाचा विचार करायला पाहिजे होता. कारण, हा डावखुरा फलंदाज चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो म्हणाला, ” एक नाव जे, निश्चितरीत्या संघात असायला पाहिजे होते, ते शिवम दुबे आहे आणि त्याच्या नावाचा निवडकर्त्यांनी विचार केला पाहिजे होता. तुम्हाला हार्दिक पंड्याच्या बॅकअपची गरज आहे. शार्दुल ठाकूर पंड्याचा बॅकअप नाहीये.”
सुनील जोशींचं मत वेगळं
मात्र, माजी निवडकर्ते आणि फिरकीपटू सुनील जोशी (Sunil Joshi) यांनी गंभीरच्या मतापेक्षा वेगळे मत मांडले. ते म्हणाले की, त्याच्याकडे वनडे क्रिकेटचा अनुभव नाहीये. ते जोशी म्हणाले, “मी असा विचार नाही करत. आपण दुबेला पाहिले आहे. तो टी20 क्रिकेट प्रकारात धावा करतो, पण हा पूर्णपणे वेगळा क्रिकेट प्रकार आहे. गौतमच्या मताचा मी आदर करतो, पण माझा विचार असाच आहे. दुबेने गोलंदाजीत खूपच संघर्ष केला आहे.”
दुबेची आयपीएल कामगिरी
शिवम दुबे याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केले. दुबेने चेन्नईला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 14 डावात 158.33च्या स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या होत्या. मात्र, तो भारताकडून फक्त एकच सामना खेळू शकला. त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. (he cant be backup of hardik pandya gautam gambhir wanted this player to be part of asia cup team)
हेही वाचा-
पावसामुळे तिसरा सामना रद्द! 2-0 ने मालिका टीम इंडियाच्या नावे, बुमराह मालिकावीर
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’