पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडून त्याला आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. 2023 वर्ष पॅट कमिन्ससाठी खऱ्या अर्थाने खास ठरले. त्याने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्या मते कमिन्सला सरनायझर्स संघाचे कर्णधारपद सोपवणे, योग्य निर्णय नाही.
पॅट कमिन्स (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा नवा कर्णधार बनल्यानंतर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने प्रतिक्रिया दिला आहे. आकाश चोप्राच्या मते संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय चुकिचा आहे. कारण कमिन्सचे आयपीएलमधील प्रदर्शन समाधानकारक नाहीये. मागच्या हंगामात ऍडेन मार्करम सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. पण आयपीएल 2024 च्या लिलिवात कमिन्ससाठी फ्रँचायझीने 20.50 कोटी रुपये खर्च केले आणि ऑस्ट्रेलियन दिग्गजला संघात सामील केले. कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने एवढी मोठी रक्कम कमिन्सवर खर्च केली, असे अंदाज तेव्हापासून बांधले जात होते. कमिन्स आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडूही ठरला होता.
असे असले तरी, आकाश चोप्रा हैदराबाद फ्रँचायझीच्या या निर्णयाशी सहमत नाहीत. चोप्रा म्हणाला की, “तुम्ही पॅट कमिन्सला कर्णधार बनवले आहे. पण अलिकडच्या काळातील त्याचे आयपीएलमधील आकडे पाहिले आहेत का? तुम्ही त्याचे आकडे पाहिले, तर तो खूप जास्त धावा खर्च करतो. तसेच फलंदाजाच्या रुपात जास्त धावाही करत नाही. प्लेइंग इळेव्हनमद्ये केवळ चार विदेशी खेळाडूंना जागा मिळते. पॅट कमिन्स पावरप्लेमध्येही गोलंदाजी करत नाही आणि शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजी करत नाही. जर तो या सर्व गोष्टी करत नसेल, तर प्लेइंग इलेव्हनमध्येच त्याची जागा निश्चित नाहीये. त्याने नुकताच वनडे विश्वचषक जिंकला आहे, टी-20 नाही.”
दरम्यान, मागच्या वर्षी कमिन्सने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना आणि वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध जिंकला. त्याचसोबत ऍशेस ट्रॉफी मागच्या वर्षी कमिन्सच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आपल्याकडे कायम ठेवली.
महत्वाच्या बातम्या –
दोन दिवसाच चार खेळाडू खेळणार 100वा कसोटी सामना; दिग्गजांमध्ये आर अश्विनही सामील
धरमशालेत रोहितची रॉयल एन्ट्री! बस-कार नाही, थेट चॉपरमधून उतरला भारतीय कर्णधार