रविवारी (२६ सप्टेंबर) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. डबल हेडरचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला.या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण मुंबई इंडियन्स संघाला गेल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ या सामन्यात जोरदार पुनरागमन करणार असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु मुंबई इंडियन्स संघाच्या फ्लॉप फलंदाजीने आणि ग्लेन मॅक्सवेलच्या वादळाने हे स्वप्न धुळीस मिळाले. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. ज्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्याच्या खेळीबाबत भाष्य केले आहे.
ग्लेन मॅक्सवेलवर वीरेंद्र सेहवागने टीका करणे काही नवीन नाही. जेव्हा मॅक्सवेल दिल्ली संघासाठी खेळायचा त्यावेळी देखील अनेकदा वीरेंद्र सेहवागने त्याच्यावर टीका केली होती. तो आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळतोय.आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली होती, तर दुसऱ्या टप्प्यात त्याची जोरदार कामगिरी सुरूच आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३७ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहून वीरेंद्र सेहवागने म्हटले की, “या खेळाडूकडे प्रतिभा आणि क्षमता दोन्ही आहेत, पण तो काही वेळा त्याच्या डोक्याचा वापर करत नाही.”
FIFTY!
That's a brilliant half-century from @Gmaxi_32 off just 33 deliveries.
Live – https://t.co/r9cxDv2Fqi #RCBvMI #VIVOIPL pic.twitter.com/pIWuBKACZm
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
सेहवागने क्रिकबजशी बोलताना म्हटले की, “त्याच्याकडे प्रतिभा आणि क्षमता दोन्ही आहेत, पण तो काही वेळा त्याच्या डोक्याचा वापर करत नाही. या सामन्यात त्याने डोक्याचा वापर केला आणि धावा देखील केल्या. मी त्याच्या विरोधात नाही, पण तो ज्या पद्धतीने खेळतो त्याच्या विरोधात आहे. तो एक चांगला खेळाडू आहे, परंतु तो अनेकदा परिस्थितीनुसार खेळत नाही.”
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने ३७ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली होती, तर विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर ६ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने एकहाती झुंज देत ४३ धावांची खेळी केली होती, तर क्विंटन डी कॉकने २४ धावांचे योगदान दिले होते. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना ५४ धावांनी गमवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष