---Advertisement---

भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 5:33 PM
---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी महिला हॉकी खेळातून वाईट बातमी येत आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला अर्जेंटिनाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचण्याची संधीही गमावली आहे. आता त्यांना ग्रेट ब्रिटनविरुद्ध कांस्य पदकाचा सामना खेळावा लागणार आहे.

या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने अर्जेंटिनाविरुद्ध १-० ने आघाडी घेतली होती. सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलत आघाडी घेतली. ही आघाडी पहिला क्वार्टर संपल्यानंतर कायम होती. (he Indian women’s hockey team lose to Argentina 1-2)

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1422884236864806912

मात्र, भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध असलेली आघाडी गमावली. त्यामुळे अर्जेंटिनाने भारताविरुद्ध तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करत १-१ अशी बरोबरी साधली होती.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये १८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनासाठी मारिया नोएल बॅरिऑन्यूवोने गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने ३६ व्या मिनिटाला भारतीय संघाविरुद्ध २-१ने आघाडी घेतली. हा गोलही मारियानेच पेनल्टी कॉर्नरवर केला.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही अर्जेंटिनाने ३६ व्या मिनिटाला भारतावरील २-१ ची आघाडी कायम राखली होती. चौथ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाला पिछाडीवरच राहावे लागले होते. अर्जेंटिनाने पूर्णपणे वेळ घालवण्यास सुरुवात केली होती.

यासह अर्जेंटिनाने भारतीय संघाला २-१ ने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात स्थान मिळवले. यानंतर भारतीय संघाला कांस्य पदकासाठी रिओ ऑलिंपिक्स २०१६चा सुवर्ण पदक विजेता ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध सामना करावा लागेल. ग्रेट ब्रिटनला पहिल्या सेमीफायनलमध्ये नेदरलँडने ५-१ ने पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश

-मन जिंकलंस भावा! रवी कुमार दहियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; बल्गेरियन कुस्तीपटूला केले १४-४ ने चितपट

-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---