नुकत्याच चिपळूण येथे झालेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात यजमान रत्नागिरी जिल्हाने विजेतेपद पटकावले. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद पटकावणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यात स्वप्नील शिंदेची मोलाची भूमिका निभावली.
संपूर्ण स्पर्धेत रत्नागिरी पुरुष संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. अजिंक्य पवार, अजिंक्य (भैय्या) पवार, अभिषेक भोजणे, अदित्य व शुभम या शिंदे बंधूच्या जोडीने रत्नागिरी जिल्हाला विजेतेपद पटकावून दिले. मात्र संघात अनुभवी कॉवर स्वप्नील शिंदेने ही स्पर्धा खेळण्यासाठी खुप मेहनत घेतली होती. तसेच कोच प्रशांत सुर्वे यांनी संपुर्ण स्पर्धेत आपली भूमिका चोख निभावली.
आपल्याच जिल्ह्यात स्पर्धा होत असल्याने ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची होती. विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संघात स्वप्नील शिंदे सारख्या अनुभवी खेळाडूचे असणे महत्त्वाचे होते. पण स्वप्नील ला संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घावे लागणार होते. जिल्हा चाचणी स्पर्धेच्या १ महिन्याआधी स्वप्नीलचे वजन ९७ किलो होते. पुरुष गट निवड चाचणी खेळण्यासाठी नियमानुसार ८५ किलो पेक्षा जास्त वजन असलेले खेळाडु खेळू शकत नाही.
रत्नागिरी जिल्ह्याचे संघ प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांनी स्वप्नीलला सांगितले होते की मला संघात तू पाहिजे त्यासाठी तुला तयारी करावी लागेल. मागील वर्षी संघात न खेळलेल्या स्वप्नील शिंदेने जवळपास १ महिन्यात तब्बल १२-१३ किलो वजन कमी करून स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली. कॅम्पमध्ये ३-४ तास काही न खाता सायकलिंग, रनिंग करून आपला फिटनेस चांगला केला. वजन कमी करण्यासाठी त्याने कठीण परिश्रम घेत घाम गाळला. अनेक पत्तथ सांभाळून त्याने आपला वजन कमी केलं. यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा संघात स्थान मिळवला.
रत्नागिरी जिल्हा संघात स्थान मिळवणारा स्वप्नीप अनुभवी खेळाडु होता. त्याच्या व्यतिरिक्त संघातील ९-१० खेळाडु हे सर्व युवा खेळाडु होते. पण त्यासर्व खेळाडूंसाठी स्वप्नील शिंदेच्या अनुभवाचा उपयोग झाला. ६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हाने विजेतेपद पटकावले.
स्वप्नील शिंदेने प्रो कबड्डीत पुणेरी पलटण व दबंग दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा संघातून व्यवसायिक कबड्डी खेळत आहे.