---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटीसाठी न्यूझीलंड संघात दोन मोठे बदल…

---Advertisement---

गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने त्यांच्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट संघात सामील झाला आहे. तर टॉम ब्लंडेलला वरच्या फळीमध्ये जीत रावलऐवजी जागा देण्यात आली आहे.

पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बोल्ट खेळला नव्हता. या सामन्यात न्यूझीलंड संघ 296 धावांनी हरला होता. परंतु या कालावधीत बोल्टने आपल्या तंदुरुस्तीवर काम केले. आता तो 1987 नंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ही पुष्टी केली की, ‘मधल्या फळीत खेळणार्‍या टाॅम ब्लंडेलला जीत रावलच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तो टॉम लॅथमबरोबर सलामीवीर म्हणून डावाची सुरूवात करेल.’

विलियम्सन म्हणाला, ‘तो सकारात्मक विचारांचा खेळाडू आहे आणि एक समजूतदार क्रिकेटपटू आहे. त्याला फक्त परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी त्याला त्याचा वास्तविक खेळ खेळणे महत्वाचे आहे.’

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ

टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वाटलिंग, कोलिन डी ग्रडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, नील वॅग्नर, ट्रेंट बोल्ट.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---