जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणारी टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचाही समावेश होतो. सध्या या स्पर्धेचा 16वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेतील पहिले 8 सामने पार पडले आहेत. तसेच, नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबी संघासाठी आनंदाची बामती समोर येत आहे. ती अशी की, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आरसीबी संघात लवकरच दाखल होणार आहे. याची माहिती स्वत: आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी दिली आहे. यामुळे आरसीबीची चिंता मिटून ताकद आणखी वाढणार आहे.
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरूच आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तसेच, फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या नेतृत्वातील आरसीबी संघही यावेळी रजत पाटीदार आणि जोश हेजलवूड यांच्याशिवाय खेळत आहे. पहिल्या सामन्यातून आरसीबीचा गोलंदाज रीस टोप्लेही बाहेर पडला होता. खांद्याच्या दुखापतीमुळे तो एक-दोन आठवड्यांसाठी बाहेर पडू शकतो. मात्र, आता आरसीबीसाठी सुखद बातमी समोर येत आहे.
आरसीबीच्या ताफ्यात लवकर सामील होणार हेजलवूड
न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि आरसीबीचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson) यांनी जोश हेजलवूड (Josh Jazlewood) याच्या पुनरागमनाविषयी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले आहेत की, जोश 14 एप्रिलपासून संघासोबत जोडला जाणार आहे. आरसीबीने एक ट्वीट केले होते. त्याचे उत्तर देताना हेसन यांनी पुष्टी केली की, हेजलवूड आरसीबी संघात पुनरागमन करेल. याव्यतिरिक्त श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याच्याबद्दलही सांगितले की, तो, न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर आरसीबी संघात सामील होईल.
Mike Hesson confirms Josh Hazlewood will join RCB on 14th April.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2023
A BORN ATHLETE! 💪
Josh Hazlewood talks about having to decide between pursuing Javelin Throw or Cricket, on @eatsurenow presents #RCBPodcast!
Listen to the audio versions of all ten episodes on Spotify and Apple Podcasts. 🎙️#PlayBold pic.twitter.com/WWFAFskUVK
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 5, 2023
आरसीबी संघाचा गोलंदाजी क्रम होऊ शकतो कमजोर
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात रीस टोप्ले खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यानंतर आरसीबीने भरपूर धावा खर्च केल्या. तसेच, हेजलवूड चार सामन्यांनंतर आरसीबीसाठी उपलब्ध राहील. सध्या आरसीबी संघात मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि आकाश दीप सिंग आहेत. मात्र, संघाला धारदार गोलंदाजाची गरज पडू शकते. खरं तर, बेंगलोरने पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. तसेच, कर्णधार फाफने 73 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
आता आरसीबीचा पुढील सामना केकेआरविरुद्ध गुरुवारी (दि. 6 एप्रिल) ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. (head coach mike hesson said josh hazlewood will join rcb on 14th april in ipl 2023 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
KKR vs RCB । जाणून घ्या कोणत्या संघाचे पारडे जड? ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन
आईनं सोनं विकून घेतलं पहिलं कीट, तर वडिलांनी कारगिलमध्ये फडकावला तिरंगा, आता मुगला गाजवणार आयपीए