---Advertisement---

‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 14, 2023 3:35 PM
Virat-Kohli-And-Rahul-Dravid-Interview
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने अहमदाबाद कसोटी गाजवली. त्याने वादळी शतक ठोकले. विशेष म्हणजे, त्याचे हे शतक तब्बल 3 वर्षे 3 महिने आणि 20 दिवसांनंतर निघाले. म्हणजेच, 1205 दिवसांनंतर विराटने कसोटी शतक ठोकले. त्याने या सामन्यात 364 चेंडूंचा सामना करत 186 धावा केल्या. या धावा करताना त्याने 15 चौकारही मारले. हा सामना अनिर्णित ठरला, परंतु भारताने ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटची मुलाखत घेतली. यादरम्यान त्यांच्यात रंजक चर्चा झाली.

राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला विराट कोहली (Virat Kohli) याची मजा घेतली. ते म्हणाले की, “खेळाडू आणि शतक म्हणून विराटचे अनेक कसोटी शतक आहेत. मात्र, प्रशिक्षक म्हणून मी मागील 15-16 महिन्यांपासून या क्षणाची वाट पाहिली होती. शेवटी ही वेळ आलीच. आम्ही विराटचे आणखी एक कसोटी शतक पाहिले.” यानंतर द्रविड यांनी विराटच्या कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ शतक न करण्याबाबत त्याच्या भावनांविषयी विचारले.

द्रविड यांचा विराटला कठीण प्रश्न
द्रविड म्हणाले की, “मला माहिती आहे की, तुम्ही असे व्यक्ती आहात, जे आपल्या कामगिरीवर खूप अभिमान करतात. तुम्हाला नियमितरीत्या शतक ठोकण्याची सवय आहे. कोरोनामुळे अनेक कसोटी सामने खेळले गेले नाहीत, पण इतका दीर्घ काळ कसोटीत शतक न ठोकणे कठीण वेळ होती का? आपण आकड्यांबद्दल जरा उत्सुक होतो. यादरम्यान मला तुमच्या काही खेळ्या आवडल्या. केपटाऊनमधील 70 धावांची एक चांगली खेळी होती, पण शतकाबाबत तुम्ही विचार करत होता का?”

विराटचे उत्तर
विराट कोहली याने उत्तर देत म्हटले की, तो 40 आणि 50 धावांच्या खेळीमुळे खुश नव्हता. विराट म्हणाला की, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं, तर मी माझ्या कमतरांमुळे गुंतागुंत थोडी वाढू दिली आहे. शतक न मारण्याची निराशा एक अशी गोष्ट आहे, जी एक फलंदाजाच्या रूपात तुमच्यावर वाढू शकते. मी काही प्रमाणात माझ्यासोबत असे होऊ देतो, पण याचा दुसरा पैलू असा आहे की, मी एक असा व्यक्ती नाहीये, जो 40-45 धावांनी खुश आहे. मला संघासाठी प्रदर्शन करण्यात खूप अभिमान वाटतो.”

विराट पुढे बोलताना म्हणाला की, “जेव्हा मी 40 धावांवर फलंदाजी करतो, तेव्हा मला समजते की, मी 150 धावा करू शकतो. मला एक गोष्ट आतल्या आत खात होती की, मी संघासाठी इतकी मोठी धावसंख्या का करू शकत नाहीये? कारण, मला याचा अभिमान होता की, जेव्हा संघाला माझी गरज होती, तेव्हा मी उभा राहायचो. कठीण परिस्थितीतही धावसंख्या उभारायचो. मी असे करण्यात यशस्वी होत नव्हतो आणि त्यामुळे हीच बाब मला चिंतेत टाकत होती.”

विराटला सामनावीर पुरस्कार
चौथ्या कसोटीतील 186 धावांच्या खेळीसाठी विराट कोहली याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. हा त्याचा कसोटी कारकीर्दीतील 10वा सामनावीर पुरस्कार ठरला. (head coach rahul dravid interviewed virat kohli after winning test series against australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम
वाद थांबेना! इंदोर खेळपट्टीला ‘खराब’ म्हणणाऱ्या आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयचे मोठे पाऊल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---