चालू वर्षातील ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे क्रिकेटचा विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जाते. भारतीय संघाकडे यजमानपद असल्याने अनेकांनी भारताला विजेतेपदासाठी पसंती दिली. याच विश्वचषकाबाबत प्रश्न विचारला असता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली योजना सांगितली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी राहुल द्रविड पत्रकारांना सामोरे गेले. या पत्रकार परिषदेत त्यांना आगामी विश्वचषकाच्या तयारीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी द्रविड म्हणाले,
“विश्वचषकासाठीच्या योजनांबाबत आम्ही एकदम स्पष्ट भूमिका ठेवली आहे. 17 ते 18 खेळाडू आमच्या रडारवर असून, त्यांच्यामधूनच अंतिम संघ निश्चित केला जाईल. या संघातील काही खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. मात्र, ते विश्वचषकापूर्वी पूर्ण तंदुरुस्त असतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
द्रविड पुढे बोलताना म्हणाले,
“आम्हाला संघात एक लवचिकता हवी आहे. भारत हा मोठा देश असून विश्वचषकातील सामने वेगवेगळ्या परिस्थितीत खेळावे लागतील. त्यासाठी तसे खेळाडू असणे गरजेचे असते. कधी तुम्हाला चार वेगवान गोलंदाजांची गरज भासू शकते तर कधी तीन फिरकीपटूही खेळवावे लागू शकतात. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीतील खेळाडूंची चाचपणी करतोय.”
भारत मागील 12 वर्षापासून कोणताही विश्वचषक जिंकू शकलेला नाही. 2011 मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अखेरच्या वेळी वनडे विश्वचषक जिंकलेला. त्यानंतर सलग दोन विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे आता मायदेशात होत असलेला विश्वचषक उंचावण्याचे उद्दिष्ट कर्णधार रोहित शर्मा व भारतीय संघाने ठेवलेय.
(Head Coach Rahul Dravid Talk About 2023 ODI World Cup Plans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीनच ओव्हरमध्ये पंड्याने केला कांगारूंचा खेळ खल्लास, हेड-स्मिथ अन् मार्शला ‘असं’ धाडलं तंबूत, वाचाच
सिराजने गमावले नंबर वनचे सिंहासन! एकही सामना न खेळता ऑसी गोलंदाज पहिल्या क्रमांकावर