आगामी ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी’चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. वास्तविक, भारतीय संघ दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत आपले सामने खेळणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर देखील केले आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरूवात बांगलादेशविरूद्ध करणार आहे. भारत-बांगलादेश संघ (20 फेब्रुवारी) रोजी सामना होणार आहे. यानंतर (23 फेब्रुवारी) रोजी भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारत-पाकिस्तान संघातील चॅम्पियन्स ट्राॅफीमधील आकडेवारीबद्दल जाणून घेऊया.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तानची आकडेवारी काय आहे? कोणत्या संघाचं पारडं जड आहे? तसेच हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरूद्ध पाकिस्तानचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
आतापर्यंत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान एकूण 5 वेळा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केले आहे. याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये भारत-पाकिस्तान 2 वेळा आमनेसामने आले होते. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, मात्र फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
आत्तापर्यंत भारताने एकदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय भारत एकदा श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता ठरला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013चे विजेतेपद भारतीय संघाला जिंकता आले नाही. त्यावेळी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) होता. भारताने फायनलमध्ये यजमान इंग्लंडचा पराभव केला होता. त्याचवेळी, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2002च्या फायनलमध्ये भारत-श्रीलंका संघ आमने-सामने होते, परंतु पावसामुळे सामना वाहून गेला. त्यानंतर दोन्ही संघांची विजेती निवड करण्यात आली. त्यावेळी भारताचा कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक-
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत – दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध द. आफ्रिका – कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत – दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका – रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड – लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लाहोर
1 मार्च – द. आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत – दुबई
4 मार्च – सेमीफायनल 1* – दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2* – लाहोर
9 मार्च – फायनल – लाहोर/दुबई
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली, रोहित, पंत नाही, तर हा खेळाडू भारतासाठी ‘वन मॅन आर्मी’ रवी शास्त्रींचे मोठे वक्तव्य
बाॅक्सिंग डे कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज! जाणून घ्या प्लेइंग 11, पिच रिपोर्टसह सर्वकाही
ख्रिसमस दिवशी एमएस धोनी बनला सांताक्लाॅज! धोनीचा नवा लूक एकदा पाहाच