यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. सध्या या स्पर्धेत सुपर १२ फेरीतील सामने सुरू आहेत, ज्यामध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ चांगली कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. तत्पूर्वी पाहूया या दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी.
ऑस्ट्रेलिया संघाने गेल्या सामन्यात ५ गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. तर श्रीलंका संघाने देखील बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १७० धावांचा पाठलाग करताना ५ गडी राखून विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये वरच्या स्थानी असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने थेट सुपर-१२ फेरीत प्रवेश केला तर, श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळून सुपर-१२ फेरीत प्रवेश करावा लागला आहे.
श्रीलंका संघाने पात्रता फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात देखील विजय मिळवला आहे. त्यामुळे श्रीलंका संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. परंतु ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात श्रीलंका संघाची खरी परीक्षा असणार आहे.
या सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सामना क्रमांक- २२, सुपर -१२ फेरी
दिनांक आणि वेळ – गुरुवार, २८ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई
आमने सामने कामगिरी
आमने सामने कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे दोन्ही संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी ८-८ सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ३ सामन्यांपैकी २ सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन – आरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यु वेड (यष्टिरक्षक), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, एडम झांपा, जोश हेज़लवुड
श्रीलंका संघाची संभावित प्लेइंग ईलेव्हन –कुसल परेरा (यष्टिरक्षक), पथुम निसानका, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, वनिन्दु हसरंगा, लाहिरु कुमारा
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजचा संघ करणार जरबदस्त पुनरागमन! आयपीएलमध्ये चमकलेल्या ‘या’ धाकड अष्टपैलूला दिलीय संधी
बडे दिलवाला आझम..! न्यूझीलंडला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना स्वत: केली शांत राहण्याची विनंती, होतंय कौतुक