भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेतील पहिली कसोटी नॉटिंगहॅममध्ये खेळली गेली होती, जी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवर दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर ब्रिटिश संघाने गुडघे टेकले. इंग्लंडचा डाव 120 धावांवर गडगडला अन् भारतीय संघाने 151 धावांनी विजय मिळवला.
यासह सध्या भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी तयार असलेल्या हेडिंग्ले स्टेडियमवर दोन्ही संघातील खेळाडूंनी कसून सरावास सुरुवात केली आहे.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या संभाव्य अकरा खेळाडूंच्या यादीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असतील. याआधी ते दोघे विलगिकरणामुळे मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते.
https://twitter.com/BCCI/status/1429458221073264642?s=20
भारताच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला आतापर्यंत झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळालेली नाही. लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. त्यानंतर अश्विनला संघामध्ये स्थान मिळवणे थोडे कठीण झाले आहे. प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल न करता भारतीय क्रिकेट संघ तिसरी कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल अशी शक्यता आहे. मात्र, काही क्रिकेट जाणकारांच्या मते अश्विनला तिसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते. मग रवींद्र जडेजाला संघाबाहेर जावे लागू शकते. सोबतच अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांना संधी दिली जाते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
https://twitter.com/BCCI/status/1429458396986572803?s=20
दुसरीकडे सध्या भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. या खेळाडूंना हेडिंग्ले येथे एकही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. हेडिंग्ले येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 19 वर्षांपूर्वी 2002 मध्ये खेळला गेला होता.
https://twitter.com/BCCI/status/1429360347098587139?s=20
त्यावेळी सध्याच्या संघातील एकही खेळाडू भारतीय संघाचा भाग नव्हता. याचाच अर्थ, भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू हेडिंग्लेवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारतीय संघाला संभाव्य अकरा खेळाडूंची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. तसेच त्याच्या कामगिरीवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी होल्डरचा डावपेच, मुद्दाम छेड काढत ‘अशी’ घेतली विकेट
‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…
अनुभवहीन भारतीय शिलेदारांची हेडिंग्लेवर ‘खरी कसोटी’; सर्व ११ खेळाडू करणार डेब्यू