गेल्या आठवड्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने त्याचा भारतीय संघातील स्पर्धक आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
कार्तिकनंतर भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलनेही ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात धोनीबद्दल त्याचा भावना व्यक्त केल्या.
पार्थिवला विचारण्यात आलेल्या प्रश्नात असा एक प्रश्न होता. त्यामध्ये त्याला विचारले की धोनीमुळे तुला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले आहे असे वाटते का?
“मला असे वाटत नाही की मी भारतीय संघातील माझे स्थान धोनीमुळे गमावले आहे. माझे स्थान माझी कामगिरी न झाल्याने मी गमावले आहे. ज्यावेळी मला संधी मिळाली होती तेव्हा मी चांगली कामगिरी केली असती तर आज धोनीच्या जागी मी असतो.” पार्थिव धोनीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
पार्थिव पटेलला भारतीय संघाकडून खेळण्यासाठी पहिली संधी 17 वर्षाचा असताना मिळाली होती. त्याने 2002 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण नंतर त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघाकडून जास्त संधी मिळाली नाही.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पार्थिवला पदार्पणाची संधी 2003 साली न्युझीलंड विरुद्ध मिळाली होती. इथेही खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले होते.
महत्वाच्या बातम्या-
-धोनी-कोहलीवर या युवा क्रिकेटपटूची स्तुतीसुमने
–एकदिवसीय विश्वचषकात हे तीन संघ करू शकतात 500 धावा