भारत विरुद्ध इंंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा झाली.
इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करुनही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठी विचार झाला नाही.
या इंग्लंड दौऱ्यातील टी-20 मालिकेतील तिसऱ्या तर, एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
गेल्या चार वर्षात रोहित शर्माला सातत्याने कसोटी संघात संधी दिली होती. पण त्याला या संधीचा लाभ घेता आला नाही.
काल भारतीय कसोटी संघात स्थान न मिळ्याल्याने निराश झालेल्या रोहितने एका ओळीचे भावुक ट्विट केले.
Sun will rise again tomorrow 😊
— Rohit Sharma (@ImRo45) July 18, 2018
“कल सूरज फिर निकलेगा” असे रोहित आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.
रोहित शेवटचे जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी न केल्याने त्याला अंतिम 11 मधून वगळण्यात आले होते.
महत्वाच्या बाातम्या-
-एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम, रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा
२०१९ चा विश्वचषक खेळायचा असेल तर धोनीने फलंदाजीत सुधारणा करावी- सौरव गांगुली