दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चषकात बुधवारी (दि. 21 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संंघ आमने-सामने होते. बंगळुरूत खेळला गेलेला हा सामना भारतीय संघाने 4-0ने आपल्या खिशात घालत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारुण पराभव केला. कर्णधार सुनील छेत्री याने सर्वाधिक 3 गोल आपल्या नावावर केले. असे असले, तरीही हा सामना एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत राहिला. या सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
जेव्हाही भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आमने-सामने असतात, तेव्हा त्यांच्यातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळते. अशात सॅफ फुटबॉल चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यातही उभय संंघाचे खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल होत आहे. या व्यतिरिक्त नेटकरी सातत्याने कमेंट्स करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्यात बंगलुरूत खेळल्या गेलेल्या सॅफ चषकातील या सामन्यादरम्यान दोन्ही देशाचे खेळाडू एकमेकांशी भिडतानाचा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. खरं तर, सामन्याच्या अर्ध्या वेळेची शिट्टी वाजण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघाचे खेळाडू आपसात भिडले. यादरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
#WATCH: Scuffle Breaks Out Between India, Pakistan Players During SAFF Cup 2023 Match#INDvsPAK #football #SAFF2023 pic.twitter.com/pYyTWJOyOt
— Shubham Rai (@shubhamrai80) June 21, 2023
पण का भिडले?
झाले असे की, ज्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचे खेळाडू एकमेकांशी भिडले, तेव्हा भारतीय संघ 2-0ने आघाडीवर होता. त्यावेळी फक्त 16 मिनिटांचा खेळ झाला होता. खरं तर, जेव्हा पाकिस्तानी खेळाडू चेंडू आतल्या बाजूने टाकत होते, तेव्हा भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी मध्यस्थी करत चेंडू उचलला होता. या कृत्यासाठी त्यांना रेड (लाल) कार्डही देण्यात आले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी प्रशिक्षकाला मैदानावरील भांडणासाठी दोषी मानले गेले, त्यासाठी त्यांना येलो (पिवळे) कार्ड दिले गेले.
हा वाद मिटला असला, तरीही यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (heated moment between india pakistan players during football match video goes to viral)
महत्वाच्या बातम्या-
SAFF CUP: ‘ब्लू ब्रिगेड’कडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! कॅप्टन छेत्रीची हॅट्रिक
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान