मुंबई । इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हीथर नाइट हिची जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणती केली जाते. 26 डिसेंबर 1990 मध्ये जन्मलेल्या हीथरने 2010 साली भारताविरुद्ध वनडे सामना खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने पाठीमागे वळून कधी पाहिले नाही.
शंभरपेक्षा जास्त सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हीथरला जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठापैकी एक यूनिवर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमधून नेचर सायन्स चे शिक्षण घेण्याची ऑफर तिला मिळाली होती. मात्र क्रिकेटला अधिक वेळ देण्यासाठी तिने ही ऑफर धुडकावून लावली. तिने कॅड्रिफ युनिव्हर्सिटीमधून बायोमेडिकल सायन्सचे शिक्षण घेण्याचे ठरवले.
हीथर नाइटने वयाच्या आठव्या वर्षीच क्रिकेट खेळणे सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचे पदार्पण सारा टेलरच्या जागेवर झाले होते. 2010 साली मुंबई येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात सारा टेलरला दुखापत झाली होती. तिच्या जागेवर हीथरला संधी मिळाली होती.
हीथरने एका वनडे सामन्यात अर्धशतक आणि त्याच बरोबर पाच बळी टाकण्याचा विक्रम केला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटर आहे. तिच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2017 साली वनडे विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय संघास 9 धावांनी हरवले होते.
2017 साली विश्वचषक जिंकल्यानंतर हीथरने तिच्या बॉयफ्रेंडला घराच्या बाहेर काढले होते. तिने असे जाणून बुजून केले नव्हते. सामना संपल्यानंतर झालेल्या मुलाखतीत तीने सांगितले की, तिला तिच्या बॉयफ्रेंडला मिस करायचे नव्हते. त्यामुळे तिने आपल्या शेअर फ्लॅटची चावी सोबत आणली होती. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड घरांमध्ये जाऊ शकला नाही.