---Advertisement---

स्मिथच्या ऐवजी हा खेळाडू लढवणार राजस्थान राॅयल्सचा किल्ला…

---Advertisement---

आयपीएलचा ११ वा मोसम ७ दिवसांवर आला आहे. पण काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला धक्का बसला होता.

त्यांनी लिलावाआधी कायम केलेल्या स्टीव्ह स्मिथवर चेंडू छेडछाड प्रकरणी आयपीएल खेळण्याची बंदी घातली गेली.

यामुळे राजस्थानला त्याचा बदली खेळाडू घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राजस्थान संघाने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनची स्मिथचा बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. याबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

क्लासेनला त्याच्या ५० लाख या मूळ किमतीत राजस्थानने संघात घेतले आहे. क्लासेनची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्याने आत्तापर्यंत ४९ ट्वेन्टी२० सामन्यात ३५.९६ च्या सरासरीने १०४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

राजस्थान संघाने स्मिथला आधी कर्णधार म्हणून घोषित केले होते. पण चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथने हे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे त्याच्याऐवजी अजिंक्य राहणेकडे राजस्थानचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment