वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (21 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान मुंबई येथे सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला नेस्तनाबूत करत 229 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात शानदार शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन हा सामनावीर ठरला. मात्र, सामना संपल्यानंतर त्याने आपण या पुरस्काराचे हकदार नसल्याचे सांगितले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. मात्र, मधल्या फळी त्यांचे काही बळी लागोपाठ गेल्याने क्लासेन याच्यावर मोठा दबाव आलेला. त्यासोबतच हॅमस्ट्रिंग आणि उष्णतेचा त्रास होत असताना देखील त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 97 चेंडूवर 109 धावांची खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्यावेळी बोलताना तो म्हणाला,
“या पुरस्काराचा खरा मानकरी मी नव्हेतर मार्को जेन्सन आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत मोठे योगदान दिले. मला उष्णतेचा खूप त्रास होत होता. त्यावेळी त्याने मला उत्साहीत केले. तसेच मोठे फटके मारून धावा वसूल करत माझ्यावरील दबावही कमी केला.”
जेन्सन याने 37 व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर काहीशी संथ सुरुवात केली होती. मात्र, बसल्यावर त्याने फक्त 42 चेंडूवर 3 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीला आल्यावर डेव्हिड मलान व जो रूट यांचे महत्त्वपूर्ण बळीही मिळवले.
या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने आपले गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम राखले. तर, इंग्लंडचा हा चार सामन्यातील तिसरा पराभव ठरला.
(Heinrich Klaseen Said Marco Jansen Is Real Man Of The Match Against England)
महत्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग
खर्याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली