अमेरिकेमधील सर्वात लोकप्रिय खेळामध्ये गणला जाणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन मध्ये सध्या एकूण ३० संघ खेळत आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय संघ म्हणजे क्लीवलैंड कवैलियर्स, गोल्डन स्टेट वॉरियर्स, लॉस अँजेल्स लेकर्स, न्यू यॉर्क निक्स, शिकागो बुल्स, बोस्टन नग्गेट्स. या संघांबरोबरच या संघातील खेळाडू ही तितकेच लोकप्रिय आहेत.
या लेखात आपण एनबीएमध्ये सर्वात जास्त मानधन असणाऱ्या तीन खेळाडूंची चर्चा करू:
#३ पॉल मिलसप – (डेन्वेर नग्गेट्स)
पॉल मिलसप सध्या डेन्वेर नग्गेट्स या संघामध्ये खेळत आहे. याचे सध्या एक वर्षाचे मानधन तब्बल $30,769,231 इतके आहे. डेन्वेर नग्गेट्समध्ये पॉल मिलसप पॉवर फॉरवर्ड या पोजिशनवर खेळतो. त्याला एनबीए ऑल स्टार अवॉर्ड, एनबीए ऑल डिफेंसिव्ह सेकंड टीम तसेच अनेक एनबीए अवॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.
#२ लेब्रॉन जेम्स- (क्लीवलैंड कवैलियर्स)
या यादीतला दुसरा खेळाडू म्हणजे लेब्रॉन जेम्स. ‘फेस ऑफ द एनबीए’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू क्लीवलैंड कवैलियर्स या संघामध्ये खेळत आहे. जगातील सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा जेम्स बास्केटबॉल मधून मिळणाऱ्या मानधनामध्ये ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्सचे फक्त बास्केटबॉलमधून मिळणारे मानधन $33,285,709 इतके आहे. क्लीवलैंड कवैलियर्स संघासाठी लेब्रॉन जेम्स स्मॉल फॉरवर्ड या पोजिशन वर खेळतो आहे. लेब्रॉन जेम्स हा अमेरिकेतच नाहीतर इतर देशांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. एनबीए चॅम्पियनशिप, एनबीए स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू, एनबीए रुकी ऑफ द प्लेअर, असे अनेक पुरस्कार त्याच्या नावावर आहेत.
#१ स्टिफन करी- (गोल्डन स्टेट वॉरियर्स)
मागील काही काळापासून बास्केटबॉल मधील सर्वाधिक वलयांकित खेळाडू म्हणजे स्टीफन करी. हा खेळाडू सध्या सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. करी एनबीएमधील गोल्डन स्टेट वॉरियर्स या संघामध्ये खेळत असून तो वर्षाला $34,682,550 इतकी मोठी रक्कम मानधन म्हणून कमावतो. स्टिफन करी वॉरियर्स संघात पॉईंट गार्ड या पोजिशनवर खेळतो. एनबीएमध्ये त्याने एकूण १६ अवॉर्ड्स जिंकलेले आहेत. त्यापैकी काही सर्वात महत्वाचे अवॉर्ड्स म्हणजे एनबीए स्पोर्ट्समनशिप अवॉर्ड, एनबीए ऑल रुकी फर्स्ट टीम अवॉर्ड्स असे अनेक अवॉर्ड्स त्यानी मिळवलेले आहेत.