नवी दिल्ली । १६ फेब्रुवारी २०१५ रोजी आयपीएलमध्ये हार्दिक पंड्या नावाच्या खेळाडूला १० लाख रुपयांत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील केले होते. तेव्हा ज्या ६७ खेळाडूंची लिलावात खरेदी झाली होती, त्यातील हार्दिक नाव हे एकदम छोटे होते.
आज तोच हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सर्वात मोठा व हक्काचा खेळाडू आहे.
आज रिकी पाॅटींगच्या या शिष्यातील गुणवत्ता हेरुन एक चांगला खेळाडू म्हणून घडवले. क्रिकबझ वेबसाईटवर हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना हार्दिकने मनमोकळेपणाने चर्चा केली.
यावेळी हार्दिकने संघात स्वत:लाही संधी दिली. परंतु कर्णधार म्हणून मात्र हार्दिकने रोहितची निवड केली नाही. त्याने कर्णधार म्हणून एमएस धोनीला संधी दिली.
हार्दिकच्या या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व ख्रिस गेलची निवड केली. तर तिसऱ्या स्थानावर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, चौथ्या स्थानावर मिस्टर ३६० एबी डिविलियर्स तर मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला पाचव्या स्थानावर संधी दिली.
कर्णधार व यष्टीरक्षक म्हणून हार्दिकने एमएस धोनीची तर सातव्या स्थानावर स्वत:ची निवड केली आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा सुनिल नारायण व राशिद खानवर तर वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह व लसिथ मलिंगाची निवड केली आहे.
हार्दिक पंड्याची आयपीएल ड्रीम ११- ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सुनिल नारायण, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंड संघाला मिळणार नवा कसोटी कर्णधार, बेन स्टोक्स होणार पहिल्याच कसोटीत…
-संपुर्ण वेळापत्रक: लाॅकडाऊननंतर सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक
-वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात ज्यो रुट होवू शकतो संघाबाहेर, कारण…