---Advertisement---

हिरो आयएसएल नव्या ढंगात, उत्कंठा शिगेला पोहोचवणार हे पर्व!

On: बुधवार, ऑक्टोबर 5, 2022 9:07 PM
ISL
---Advertisement---

हिरो इंडियन सुपर लीगच्या यंदाच्या पर्वाला 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आणि यंदाचे पर्व हे अधिख उत्कंठा शिगेला पोहोचवणारे असणार आहे. ट्वेल्थ मॅन प्रेक्षकही यंदाच्या पर्वात स्टेडियमवर परतणार आहेत आणि आपापल्या संघाला चिअर करताना दिसणार आहेत. यंदाच्या पर्वाच्या सुरुवातीलाच बऱ्याच आयएसएल संघांनी आपापला मुख्य संघ Durand Cup स्पर्धेत उतरवला होता. या संघांनी आयएसएलसाठी जय्यत तयारी केली आहे.

गतविजेता हैदराबाद एफसी यंदाच्या पर्वात इतिहास घडविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. हिरो आयएसएलमध्ये आतापर्यंत एकाही संघाला जेतेपद कायम राखता आलेले नाही आणि हा विक्रम हैदराबाद एफसीला खुणावतोय. पर्वाच्या सुरूवातीच्या ट्रान्सफर विंडोमुळे रॉय कृष्णा व ग्रेग स्टीवर्ट हे नव्या क्लबकडून खेळताना दिसतील आणि सर्वोच्च आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमुळे यंदाच्या विजेतेपदाची चुरस ही नेहमीपेक्षा अधिक कट्टर होणार आहे.”यंदाच्या पर्वात आमचा संघ चांगला आहे, असे मला वाटते. काही संघांनी गुणवत्ता सुधारली आहे आणि हे स्पर्धेसाठी चांगले आहे, असे मला वाटते. कारण त्याने सर्व संघ काही महत्त्वाचे गुण गमावतील. गेल्या मोसमात ओडिशा एफसीला फक्त दोन सामने शिल्लक असताना अंतिम फेरीच्या शर्यतीसाठी पात्र ठरण्याची संधी होती. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांना पराभूत करू शकतो आणि ही सर्वांसाठी समान स्पर्धा असेल हे निश्चित,”असे मत हैदराबाद एफसीचे मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ यांनी व्यक्त केले.

हैदराबाद एफसीची सर्व भीस्त प्रमुख खेळाडू बार्थोलोमेव ओग्बेचे याच्यावरच असणार आहे. मागील पर्वात त्याने सर्वाधिक १८ गोल केले होते आणि हैदराबाद एफसी हा सर्वाधिक गोल करणारा संघ ठरला होता. हैदराबाद एफसीचा तो पाठीचा कणा आहे आणि त्याच्यासोबतीला कर्णधार जोआओ व्हिक्टर आहेच. ‘”मी हे गेल्या वर्षी म्हणालो होतो, मी फक्त कर्णधाराचा आर्मबँड घालतो, परंतु आमच्या संघात लिडर्सनी भरलेला आहे. त्यांचा अनुभव हा संघातील युवा खेळाडूंना मदत करणारा ठरतोय,” असे व्हिक्टर म्हणाला.

हैदराबाद एफसीसमोर कडवे आव्हान असणार आहे ते एटीके मोहन बागान, मुंबई सिटी एफसी व बंगळुरू एफसीचे… नव्या पर्वासाठी याही संघांनी तगड्या खेळाडूंची फौज उभी केली आहे. बंगळुरू एफसीचा माजी मध्यरक्षक एरिक पार्तालू याने मुंबई सिटी एफसी यंदा अन्य संघांना कडवी टक्कर देईल आणि जेतेपद जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तो म्हणाला,”मुंबई सिटी एफसीचा संघ यंदा आव्हानात्मक आहे. डेस बकिंगहॅमने गेल्या मोसमात पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी काही मोठे खेळाडू गमावले होते. गेल्या वर्षी त्यांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला होता, परंतु आशियाई चॅम्पियन्सच्या जेतेपदाने मुंबई सिटीचा आत्मविश्वास उंचावला आहे. मागील पर्वातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला ग्रेग स्टीवर्टही त्यांच्या ताफ्यात दाखल झाला आहे आणि त्याने Durand Cup मध्ये गोल्डन बॉलचा पुरस्कार पटकावला आहे. तोही यंदाच्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.”

मुंबई सिटी एफसी हा यंदाच्या पर्वातील बलाढ्य संघांपैकी एक आहे. त्यांच्या ताफ्यात रोस्टीन ग्रिफिथ्स, अलबर्टो नोग्युरा आणि जॉर्ज पेरेएरा डाएझ या दिग्गजांसह भारतातील प्रतिभावंत खेळाडूंची फौज आहे. एटीके मोहन बागान हा आणखी एक आव्हानात्मक संघ यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील दोन पर्वात त्यांना उपांत्य फेरीतपर्यंतच समाधान मानावे लागले होते आणि AFC चषक आंतर विभागीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही त्यांनी प्रवेश केला होता. प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी म्हटले आहे की मोठ्या सामन्यांमध्ये त्यांच्या संघासाठी मानसिक अडथळे आले होते आणि ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ पाच खेळाडूंच्या संघात अनुभवाची भर पडल्यास ते पुन्हा प्रबळ दावेदार बनतील.

”तुम्ही एटीके मोहन बागानचा संघ पाहिल्यास तुम्हाला हे नक्की जाणवेल ही तो जेतेपदाचा प्रबळ दावेदारांमध्ये असेल. आशिष राय व आशिक कुरुनियान यांच्या येण्याने संघ अधिक मजबूत झाला आहे,”असे मत आयएसएल तज्ज्ञ पॉल मॅसफिल्ड यांनी व्यक्त केले. मॅसफिल्ड आणि पार्तालू यांच्या मते एटीके मोहन बागान हा अव्वल सहा संघांमध्ये असेल आणि पर्वाच्या अखेरीस जेतेपदासाठी कडवी टक्कर देईल. बंगळुरू एफसीच्या बाबतितही त्यांचे हेच मत आहे. दिग्गज सुनिल छेत्री याच्यासोबत स्ट्रायकर रॉय कृष्णा खेळताना दिसणार आहे. मागील दोन पर्वात बंगळुरूच्या आक्रमणात उणिवा जाणवल्या होत्या, परंतु त्यांनी मागच्याच महिन्यात Durand Cup जिंकून प्रतिस्पर्धींना आव्हान दिले आहे.

हिरो ISL या मोसमासाठी प्रत्येक संघात सहा विकासात्मक भारतीय खेळाडू असायला हवेत आणि त्यामुळे भारतातील युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळेल. या हंगामात चेन्नईयन एफसीचे विन्सी बॅरेटो, केरळ ब्लास्टर्सचे प्रभसुखन गिल आणि ओडिशा एफसीचे नरेंद्र गहलोत हे काही उदयोन्मुख खेळाडू आहेत. लिस्टन कोलाको आणि सहल अब्दुल समद यांसारख्या खेळाडूंच्या नेतृत्वात भारतीय प्रतिभेचे नेतृत्व केले जाईल ज्यांनी मागील पर्व गाजवले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

फिफा अंडर17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया 2022 स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंमध्ये जागरूकता – बायचुंग भुतिया
इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यूचे तांडव! शेकडो लोकांना गमवावे लागले प्राण, अनेक जखमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---