दक्षिण आफ्रिकाचे माजी सलामीवीर फलंदाज हर्शल गिब्स यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जवळपास १५ वर्षांची होती. यादरम्यान आपल्या शानदार फलंदाजी प्रदर्शनाने त्यांनी जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती. शिवाय, वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सलग ६ षटकार मारणारे ते एकमेव फलंदाज आहेत. त्यांनी हा कारनामा २००७ साली नेडरलँडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात केला होता. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
परंतु, या महान खेळाडूचा वादांशी सतत संबंध आला होता. त्यांना बऱ्याचदा त्यांच्या वागणूकीमुळे लज्जित व्हावे लागले होते. Herschelle gibbs caught for smoking marijuana on 2001.
ती वेळ होती २००१ सालची. जेव्हा शॉन पोलॉक यांच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ कॅरेबियन दौऱ्यावर कसोटी आणि वनडे सामने खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी १०-११ मेच्या रात्री गिब्स एंटीगाच्या जॉली बीच रिसॉर्टच्या एका खोलीत गांजा फुकताना रंगेहाथ पकडले गेले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे संघसहकारी रॉजर टेलिमाकस, पॉल ऍडम्स, जस्टिन केंप आणि आंद्रे नेल हेदेखील उपस्थित होते. त्यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका संघाचे फिजिओ क्रेग स्मिथही गिब्सला साथ देत होते. ते बराच काळ दक्षिण आफ्रिका संघाचा भाग होते.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने या प्रकरणाला अतिशय कठोरपणे हाताळताना संघातील १० दोषी सदस्यांवर १० हजार दक्षिण अफ्रिकन रेंडचा दंड ठोठावला होता. हे प्रकरण गिब्स यांच्यासाठी विसरण्यासारखे नव्हते. याव्यतिरिक्त २०००मध्ये गिब्स यांंचे नाव मॅच फिक्सिंग प्रकरणात आले होते. त्यानंतर त्यांना ६ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्याबरोबरच ६०००० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
गिब्स यांच्या या २ विवादास्पद प्रकरणांमुळे त्यांना नेहमी आठवले जाते.
ट्रेंडिंग घडामोडी-
माझ्यावरील बॅनचा स्विकार करतो, परंतु सट्टेबाजांची नावं सांगणार नाही
केवळ ३ वनडे विश्वचषक खेळून तिनही विश्वचषक जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू