भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात खेळाडूंचा चांगलाच घाम निघाला. ऑस्ट्रेलियाचा वरच्या फळीतील फलंदाज स्टीव स्मिथ याने लाईव्ह सामन्यात अक्षरशः बसायला खुर्ची मागवल्याचे दिसले. उभय संघांतील हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. याठिकाणी बुधवारी (27 सप्टेंबर) मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती.
वनडे सामन्यातील तिसरा सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या तिन्ही फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतके केली आणि संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला स्टीव स्मिथ वैयक्तिक 74 धावा करून 32व्या षटकात बाद झाला. त्याआधी 28व्या षटकानंतर स्मिथने सपोर्ट स्टाफकडे बसण्यासाठी खुर्ची मागवली. लाईव्ह सामन्यात 28वे षटक संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 215 धावा होती. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्मिथसाठी मैदानात खुर्ची आणली गेली. स्मिथ त्यावर बसला आणि त्याच्या डोक्यावर आईसबॅक ठेवली गेली. हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
A chair has arrived for Smith.
It’s so hot in Rajkot, tough for players. pic.twitter.com/9IEiokp2I1
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन राजकोटमधील उष्णतेमुळे घामाघूम झाले असताना विराट कोहली () त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेला. यावेळी विराटचे गमतीशीर रुप पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाले. (Virat having fun with Labuschagne while Smith is chilling in the hot afternoon.)
Virat Kohli – what a character!
He’s having fun with Marnus Labuschagne while Steven Smith is chilling in the hot afternoon. pic.twitter.com/CVK8jmTcr3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
‘कुठल्याच खेळाडूला ही मालिका खेळायची नाहीये…’, IND vs AUS सीरिजबद्दल माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
खूपच कमी डावांमध्ये स्मिथने पूर्ण केल्या 5000 वनडे धावा, खास यादीत मिळवला चौथा क्रमांक