---Advertisement---

केंद्र सरकार तंबाखूच्या छुप्या जाहिरातींवर कारवाई करण्याच्या मूडमध्ये, बीसीसीआयचं होणार कोट्यवधी रुपयांचं नुकसान?

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 3:38 PM
Jay Shah Roger Binney
---Advertisement---

भारतात क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनेक वेळा तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात दाखवली जाते. ह्या जाहिरातीत उघडपणे तंबाखू दाखवत नाहीत, मात्र त्याचा अन्य पदार्थांद्वारे प्रचार केला जातो. या प्रकरणी आता केंद्र सरकारनं कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बीसीसीआयला आग्रह केला आहे की, भारताच्या क्रिकेट स्टेडियममध्ये दाखवण्यात येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीराती बंद करण्यात याव्या. यावर आता बीसीसीआयला पाऊल उचलावं लागेल. मंत्रालयानं पुढे सांगितलं की, क्रिकेटपटू फक्त देशातच नाही, तर जगभरात अनेक युवकांचे आदर्श आहेत. मंत्रालयानं बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि साईचे निर्देशक संदीप प्रधान यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

पत्रात आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, आयपीएल सारख्या स्पर्धांदरम्यान काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंना तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करताना पाहणं निराशाजनक आहे. बीसीसीआय यावर गंभीरपणे विचार करून अशा जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करू शकते.” याशिवाय मंत्रालयानं बीसीसीआयला विनंती केली आहे की, आयपीएल सारख्य स्पर्धांदरम्यान क्रिकेटपटूंना अशाप्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्याची परवानगी देण्यात यावी नाही.

आता या प्रकरणी चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात आहे. यावर बोर्डाला निर्णय घ्यावा लागणार आहे. बीसीसीआय क्रिकेटपटूंना तंबाखूजन्य जाहिराती करण्यावर बंदी घालते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएल 2024 दरम्यानं कपिल देव, वीरेंद्र सेहवाग यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये झळकले होते. ज्यानंतर त्यांच्यावर भरपूर टीकाही झाली आहे. चाहत्यांनी या माजी क्रिकेटपटूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती.

हेही वाचा –

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
श्रीलंकेच्या कॅम्पमध्ये पसरली भीतीची लाट! टीम इंडिया आठ महिन्यानंतर वनडे सामन्यासाठी मैदानात उतरणार
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---