दुबई | आज (२८ सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशच्या सलामीविरांनी २०.५ षटकांत १२० धावांची सलामी दिली.
यात मेहदी हसनने ३२ तर लिटन दासने नाबाद ८६ धावा केल्या. याबरोबर लिटन दासने एक खास पराक्रमही केला. कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशी खेळाडूने केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत.
यापुर्वी हा विक्रम शब्बीर राहमानने भारताविरुद्धच २०१८मध्ये प्रेमदासा स्टेडियमवर नाबाद ७७ धावांची खेळी केली होती.
तसेच भारताविरुद्ध अंतिम सामन्यात शतकी भागिदारी करणारे मेहदी हसन आणि लिटन दास ही केवळ ६वी जोडी आहे. यापुर्वी जेव्हा अंतिम सामन्यात सलामीच्या जोडीने भारताविरुद्ध शतकी भागिदारी केली त्यात ५ पैकी ५ वेळा भारताला पराभवला सामोरे जावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम
–एशिया कपमध्ये सचिनने केले होते शतकांचे शतक; पण टीम इंडियाचा झाला होता नकोसा पराभव
–आज धोनीला ‘कूल’ विक्रम करण्याची संधी; होणार सचिन, द्रविडच्या यादीत सामील!