आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यांनी २० षटकांमध्ये ३ विकेट्स गमावत २०६ धावा केल्या. यामध्ये कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज खेळी करत मोठे योगदान दिले. त्याने ६९ चेंडूत सर्वाधिक नाबाद १३२ धावा केल्या. यामध्ये ७ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. त्याने आपल्या या खेळीसोबत आयपीएल इतिहासात चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा कारनामा केला आहे.
याबाबतीत राहुलने दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सला मागे टाकले आहे. डिविलियर्सने २०१६ साली गुजरात लायन्सविरुद्ध खेळताना नाबाद १२९ धावांची खेळी केली होती.
या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने २०१३ साली पुणे वॉरिअर्स संघाविरुद्ध खेळताना नाबाद तब्बल १७५ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती. गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्यूलम असून त्याने आयपीएलच्या पहिल्या वहिल्या हंगामात नाबाद सर्वोच्च १५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरही एबी डिविलियर्स विराजमान आहे. त्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १३३ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती.
याबरोबरच राहुल हा आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करणारा भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता. त्याने २०१८ ला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी केली होती.
राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४४.३८ च्या सरासरीने २१३० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि १६ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे खेळाडू
१७५* धावा- ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) विरुद्ध पुणे वॉरिअर्स, २०१३
१५८* धावा- ब्रेंडन मॅक्यूलम (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २००८
१३३* धावा- एबी डिविलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१५
१३२* धावा- केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०२०
१२९* धावा- एबी डिविलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) विरुद्ध गुजरात लायन्स, २०१६
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलच्या इतिहासात धोनीसह सर्व यष्टीरक्षकांना राहुलने एका सामन्यात टाकलंय मागे, कारण…
-गोलंदाजीत फसला म्हणून काय झालं? फलंदाजी करताना ठोकले सलग ४ षटकार
-दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायका आयपीएल दरम्यान घेतात ड्रग्स, पहा कुणी केलाय आरोप
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज