---Advertisement---

भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 2:14 PM
---Advertisement---

भारताचा पुरूष क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. रविवारी (27 हॅमिल्टन येथे खेळण्यात आलेला हा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि कर्णधार केन विलियम्सन याने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. सामना पूर्ण झाला नसला तरी भारताचा सलामीवीर शुबमन गिल याने मात्र त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

भारताला मागील अनेक काळापासून सलामीवीरांची कमी जाणवत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोघेही आऊट ऑफ फॉर्म असल्याने त्यांच्याजागी कोण असा प्रश्न उपस्थित झाला असताना शुबमन गिल (Shubman Gill) याने जबरदस्त कामगिरी करत संघाची अडचण सोडवली. त्याने 2019मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण केले. न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 45 धावा करताच त्याने वनडेमध्ये मोठा विक्रम नावावर केला. तो भारताकडून किमान 10 वनडे डावांमध्ये खेळताना सर्वोच्च सरासरी असलेला सलामीवीर ठरला. त्याच्याआधी हा विक्रम रोहितच्या नावावर होता. गिलने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सलामीला येताना 70.71च्या सरासरीने तर रोहितने 56.55च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

गिलने भारताकडून वनडेमध्ये आतापर्यंत एकूण 14 डाव खेळले. त्यातील 10 डाव त्याने सलामीला येताना खेळले आहेत. त्याने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10 वनडे सामन्यांच्या 10 डावात 70.71च्या सरासरीने 495 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 98 राहिली. तसेच त्याने 4 अर्धशतकेही केली असून तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही. तसेच त्याचा स्ट्राईक रेट 97.44 असा राहिला. त्याने वनडेमध्ये एक शतक केले असून ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केले होते.

पुढील वर्षी भारताच आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिले जात आहे. Highest ODI Average for India as Opener (min 10 Innings)

सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वोच्च वनडे सरासरी (किमान १० डाव)
70.71 – शुबमन गिल*
56.55 – रोहित शर्मा
48.29- सचिन तेंडुलकर
44.98 – शिखर धवन

सलामीवीर म्हणून 10 डावांनंतर भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा करणारे
495 – शुबमन गिल*
478 – सचिन तेंडुलकर
463 – राहुल द्रविड
432 – शिखर धवन
425 – वीरेंद्र सेहवाग

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे टेंशन वाढले! न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाऊस विजेता
VIDEO: संजू सॅमसनवर ही काय वेळ आली! संघात तर घेतले नाहीच पण ग्राऊंडवर ताडपत्री…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---