भारतात दिवाळी, दसरा किंवा अन्य सणांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. या काळात घरातील सर्वांनाच सुट्ट्या असल्यामुळे सामन्यांना टीआरपीही चांगला मिळतो. या काळात ओघानेच अनेक विक्रमही होतात. असेच त्यातील काही खास विक्रम
रोहित शर्मा २०९ धावा
२ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने बेंगलोर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना १५८ चेंडूत २०९ धावा केल्या होत्या. त्यात १२ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश होता. हा नरकचतुर्दशीचा दिवस होता.
सचिन तेंडुलकर १८६* धावा
८ नोव्हेंबर १९९९ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हैद्राबाद येथे न्यूजीलँडविरुद्ध १५० चेंडूत नाबाद १८६ धावांची खेळी केली होती. यात सचिनने २० चौकार आणि ३ षटकार मारले होते. यावेळी सचिनचे द्विशतक थोडक्यात हुकले होते. हा दिवस बलिप्रतिपदेचा होता.
एमएस धोनी १८३* धावा
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडेत तुफानी फटकेबाजी करत जयपूर येथे धोनीने नाबाद १८३ धावा केल्या होत्या. ३१ ऑक्टोबर २००५ रोजी ही कामगिरी करताना त्याने १४५ चेंडूंचा सामना केला होता तर १५ चौकार आणि १० षटकार खेचले होते. हा दिवस नरकचतुर्दशीचा होता.