न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल या विस्फोटक जोडगोळीने विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21व्या सामन्यात भारताविरुद्ध खास पराक्रम केला आहे. या जोडीने न्यूझीलंडकडून यापूर्वी कधीही न केलेली कामगिरी करून दाखवली. धरमशाला येथील मैदानात त्यांनी भारताविरुद्ध विश्वचषकातील सहावी सर्वात मोठी भागीदारी रचली. चला तर, विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सर्वात मोठ्या भागीदारींविषयी जाणून घेऊयात…
न्यूझीलंड संघ या सामन्यात नाणेफेक गमावत फलंदाजीसाठी उतरला. यावेळी संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल (Rachin Ravindra And Daryl Mitchell) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी दीडशेहून जास्त धावांची भागीदारी झाली. रचिन आणि मिचेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 152 चेंडूत 159 धावांची भागीदारी रचली.
ही विश्वचषकात भारताविरुद्ध न्यूझीलंडची सर्वात मोठी भागीदारी ठरली. तसेच, विश्वचषकात भारताविरुद्धची एकूण सहावी मोठी भागीदारी ठरली. या भागीदारीत डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याने 78 चेंडूत 75 धावा, तर रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने 74 चेंडूत 73 धावा केल्या.
यापूर्वी विश्वचषकात भारताविरुद्ध सर्वोच्च भागीदारी रचण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डेमियन मार्टिन आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर होता. त्यांनी 2003च्या विश्वचषकात भारताविरुद्ध नाबाद 234 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ हे आहेत. त्यांनी 2015 विश्वचषकात भारताविरुद्ध 182 धावांची भागीदारी रचली होती. तिसऱ्या स्थानी इंग्लंडची जोडी डेनिस अमिस आणि कीथ फ्लेचर आहे. त्यांनी विश्वचषक 1975मध्ये भारताविरुद्ध 176 धावांची भागीदारी केली होती. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानीही इंग्लंडचीच जोडी इयान बेल आणि अँड्र्यू स्ट्रॉस आहे. त्यांनी 2011च्या विश्वचषकात भारताविरुद्ध 170 धावांची भागीदारी रचली होती. यानंतर पाचव्या स्थानीही इंग्लंडची जोडी जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय आहे. त्यांनी 2019 विश्वचषकात भारताविरुद्ध 160 धावांची भागीदारी केली होती. (Highest Partnership against India in World Cup Rachin Ravindra And Daryl Mitchell see list)
विश्वचषकात भारताविरुद्ध सर्वोच्च भागीदारी
234* – डेमियन मार्टिन आणि रिकी पाँटिंग (2003)
182 – ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ (2015)
176 – डेनिस अमिस आणि कीथ फ्लेचर (1975)
170 – इयान बेल आणि अँड्र्यू स्ट्रॉस (2011)
160 – जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय (2019)
159 – रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल (2023)*
हेही वाचा-
मोठी बातमी! विराटच्या माजी सहकाऱ्याने क्रिकेटला ठोकला रामराम, लगेच वाचा
हिमालयाच्या पहाडात घुमला ‘जन-गण-मन’चा आवाज! पाहा अंगावर येईल काटा असा व्हिडिओ