भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीमध्ये सुटली. आता भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.
या कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होणार आहे. पण त्याआधी भारतीय संघ सिडनीमध्ये आजपासून(28 नोव्हेंबर) चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिडनीमध्ये जोरजार पाऊस झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळावरही पाणी फेरले गेले.
या मालिकेत विराट कोहलीला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे आॅस्ट्रेलियात कसोटी १ हजार धावा.
विराटने आॅस्ट्रेलियात ८ कसोटी सामन्यात ६२.००च्या सरासरीने ९९२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताकडून आॅस्ट्रेलियात कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने १९९१ ते २०१२ या काळात आॅस्ट्रेलियात २० सामन्यात ५३.२०च्या सरासरीने १८०९ धावा केल्या होत्या. त्यात सचिनच्या ६ शतकी तर ७ अर्धशतकी खेळींचा समावेश होता.
या कसोटी मालिकेत जर विराटने २४५ धावा केल्या तर भारताकडून कसोटीत आॅस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा तो सचिननंतरचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.
आजपर्यंत भारताकडून आॅस्ट्रेलियात १०४ खेळाडूंनी भाग घेतला होता. यातील १०२ भारतीय फलंदाजांचा कसोटी विक्रम विराटला मोडण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पावसामुळे वाया गेलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी कर्णधार कोहलीची नवी युक्ती
–आधी त्याचे राहिलेले पैसे द्या, मग बोला- श्रीशांतच्या पत्नीचा या व्यक्तीवर जोरदार हल्लाबोल
–पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील