जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने खास विक्रम नावावर केला. तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाजही बनला. चला तर जाणून घेऊयात…
अजिंक्य रहाणेचा शानदार विक्रम
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 46व्या षटकात अर्धशतक साकारले. त्यानंतर त्याने 55व्या षटकातील अखेरच्या नो-बॉल चेंडूवर 69 धावा पूर्ण केल्या. या धावा करताच त्याच्या कसोटीतील 5000 धावा पूर्ण झाल्या. रहाणेने पहिल्या डावात 129 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. या खेळीत 1 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. या खेळीमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय
या खेळीमुळे रहाणेच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने 89 धावा केल्या. या यादीत सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांका खेळाडू सौरव गांगुली आहे. त्याने 2002च्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात 117 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. यादीत दुसऱ्या स्थानी गौतम गंभीर असून त्याने 2011च्या वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. यानंतर तिसऱ्या स्थानी एमएस धोनी असून त्यानेही 2011च्याच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद 91 धावांची खेळी केली होती.
आयसीसी अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय
117 – सौरव गांगुली (2002)
97 – गौतम गंभीर (2011)
91* – एमएस धोनी (2011)
89 – अजिंक्य रहाणे (2023)*
भारताचा डाव
सामन्याच्या तिसऱ्या भारतीय संघाचा दिवशी पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रहाणेव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी सर्वाधिक धावा केल्या. शार्दुलच्या 51, तर जडेजाच्या 48 धावा होत्या. तसेच, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. नेथन लायन 1 विकेट घेण्यात यशस्वी झाला. (Highest Score for India in ICC final ajinkya rahane score 89)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजने रागाने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकताच भडकले गावसकर अन् शास्त्री; म्हणाले, ‘हे काय सुरूये?’
अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय