---Advertisement---

भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी करणारे ३ क्रिकेटर्स

On: बुधवार, सप्टेंबर 30, 2020 12:00 PM
---Advertisement---

आयपीएलच्या या मोसमात भारतीय खेळाडूंचे चांगले प्रदर्शन होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यात एखादा तरी भारतीय खेळाडू चांगला खेळ खेळताना दिसतो. आयपीएल सुरु होण्यापूर्वी युएईच्या मैदानांबद्दल आणि तेथील खेळपटयांबद्दल चर्चा होती पण आयपीएल सुरू झाल्यानंतर या सर्व चर्चा संपुष्टात आल्या आहेत. प्रत्येकजण आयपीएलमधील फलंदाजांच्या कामगिरीचा आनंद घेताना दिसत आहे.

पहिल्या काही सामन्यांमध्ये सरासरी धावा जमल्या पण नंतर धावांचा पाऊस सुरु झाला. मग तो शारजहाचा एक छोटासे मैदान असो किंवा दुबईचे एक मोठा मैदान असो. प्रत्येक मैदानावर चौकार-षटकार मारणे सुरू झाले आहे. आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त युवा खेळाडूही चमकताना दिसू लागले आहेत.

याआधीच्या अनेक आयपीएल हंगामातही असे काही युवा खेळाडू खेळले, ज्यांनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले होते. एवढेच नाही तर त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले होते. या लेखातही अशा ३ भारतीय खेळाडूंविषयी चर्चा करु ज्यांनी भारतीय संघात स्थान मिळवण्याआधी आयपीएलमध्ये त्यांची सर्वोत्तम खेळी केली.

ईशान किशन

मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध केलेली ९९ धावांची तुफानी खेळी जबरदस्त होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सला सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र ईशान किशनने दुबईमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या खेळीमुळे त्याने भारतीय संघाकडून पदार्पण कारण्यापूर्वी सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

मनीष पांडे
मनीष पांडेने २००९ मध्ये आरसीबीकडून खेळताना ११४ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने भारतीय संघात पदार्पण केले नव्हते. त्यावेळी तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला होता. या खेळीनंतर त्याने भारतीय संघात पदार्पण केले. सध्या तो आयपीएल बरोबरच भारतीय संघाकडूनही खेळतो. तसेच मागील काही महिन्यात तो भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात नियमितपणे दिसू लागला आहे.

पॉल वॉल्थटी

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध पॉल वॉल्थटीने शतक झळकावले होते. २०११ च्या आयपीएलमध्ये पॉल वॉल्थटीने मोहालीच्या मैदानावर नाबाद १२० धावांची खेळी केली होती. जी अद्यापही देशाकडून आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्यापूर्वी भारतीय खेळाडूने केलेली सर्वात मोठी खेळी आहे. असे असले तरी आता वॉल्थटी आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---