‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो?, याचा प्रत्यय रिषभ पंत याने आज (११ जानेवारी) सर्वांना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या डावात त्याने तूफानी खेळी केली आहे. भारताचा हा यष्टीरक्षक फलंदाज संघाच्या पहिल्या डावात दुखापती झाला होता. मात्र दुखापतीनंतर जिद्दीने दुसऱ्या डावात मैदानात उतरत त्याने अनेक खास विक्रमांची खात्यात भर पाडली आहे.
दुसऱ्यांदा चौथ्या डावात नोंदवली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
सिडनी कसोटीच्या चौथ्या आणि भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात पंतचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. जोरदार फटकेबाजीने फलंदाजीची सुरवात करत पंतने ११८ चेंडूत ९७ धावा केल्या. दरम्यान त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावले. शेवटी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायनच्या फिरकीत फसल्याने पंतला पव्हेलियनला परतावे लागले.
असे असले तरी, कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दुसऱ्यांदा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याची खास कामगिरी पंतने केली आहे. यापुर्वी २०१८ ला ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात त्याने सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या होत्या. यावेळी त्याने ११४ धावांची झुंजार शतकी खेळी केली होती.
धोनी-पटेलने इंग्लंडविरुद्ध केलीय ही खास कामगिरी
पंतव्यतिरिक्त एमएस धोनी आणि पार्थिव पटेल या भारतीय यष्टीरक्षकांनी कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या आहेत. धोनीने २००७ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्याच्या शेवटच्या डावात नाबाद ७६ धावा केल्या होत्या. तर पटेलने २०१६-१७ मध्ये मोहाली येथे इंग्लंडविरुद्धच नाबाद ६७ धावा नोंदवल्या होत्या.
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च खेळी करणारे यष्टीरक्षक –
११४ – रिषभ पंत – २०१८, द ओव्हल, इंग्लंड
९७ – रिषभ पंत, २०२१, सिडनी, ऑस्ट्रेलिया
७६* – एमएस धोनी – लॉर्ड्स, इंग्लंड, २००७
६७* – पार्थिव पटेल – मोहाली, इंग्लंड, २०१६
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND Test Live: भारताला मोठा धक्का, पुजारा बोल्ड; अद्याप १३२ धावांची गरज
दमदार खेळी करून तंबूत परतणाऱ्या पंतचं सर्वांनी केलं कौतुक, पण नाराज ‘गुरुजींनी’ ढुंकूनही नाही पाहिलं
दुखापतीतून कमबॅक करत पंतने झळकावले अर्धशतक, अवघ्या २३व्या वर्षी नावे झाला ‘मोठा’ विक्रम