साऊथँम्पटन। काल(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत या मालिकेचा शेवट विजयाने केला. ही मालिके इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली असली तरी आयर्लंडने शेवट मात्र गोड केला. याबरोबरच एक खास विक्रमही केला.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकात सर्वबाद ३२८ धावा केल्या होत्या. तसेच आयर्लंडला विजयासाठी ३२९ धावांचे आव्हान दिले होते. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने सुरुवातीपासूनच चांगला खेळ दाखवला.
सलामीला फलंदाजीला उतरलेल्या अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंगने १४२ धावांची खेळी केली. त्याने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकार मारत ही खेळी केली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीचाही विजयात मोलाचा वाटा राहिला. बालबिर्नीने ११२ चेंडूत १२ चौकार मारत ११३ धावांची शतकी खेळी केली. तसेच, हॅरी टेक्टरच्या नाबाद २९ आणि केविन ओब्रायनच्या नाबाद २१ धावांच्या खेळीनेही संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
त्यामुळे परदेशात वनडे सामना खेळताना ७ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स बाकी ठेवत सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा आयर्लंड पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर होता. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १ जून २००६ ला लीड्सला झालेल्या वनडेत ३२२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी त्यांनी ८ विकेट्सने विजय मिळवला होता.
आत्तापर्यंत केवळ ३ संघांनी परदेशात खेळताना वनडेत ७ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स बाकी ठेवत ३०० पेक्षा अधिक धावाचां यशस्वी पाठलाग केला आहे. यात आयर्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेने २०१० ला वेस्ट इंडिजविरुद्ध ३०४ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी त्यांनी ७ विकेट्सने विजय मिळवला होता.
त्याचबरोबर वेस्ट इंडिजने सेंच्यूरियन येथे २००४ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात २९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३ विकेट्स गमावत ३०० धावा केल्या होत्या.
वनडेत ७ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स बाकी ठेवत परदेशात सर्वाधिक धावाचां यशस्वी पाठलाग करणारे संघ –
३२९ धावांचे आव्हान – आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, साऊथँम्पटन, २०२० (७ विकेट्सने विजय)
३२२ धावांचे आव्हान – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, लीड्स, २००६ (८ विकेट्सने विजय)
३०४ धावांचे आव्हान – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, रोझेऊ, २०१० (७ विकेट्सने विजय)
२९८ धावांचे आव्हान – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्यूरियन, २००४ (७ विकेट्सने विजय)
२९४ धावांचे आव्हान – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, २०१३ (७ विकेट्सने विजय)
महत्त्वाच्या बातम्या –
आजपासून इंग्लंड पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात, जाणून घ्या सर्वकाही
कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
धोनीने सीएसकेला सांगितलं होतं; त्या खेळाडूला घेऊ नका, तो टीमची वाट लावेल
ट्रेंडिंग लेख –
आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार
वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक