हैद्राबाद। भारताने आज(14 आक्टोबर) विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी 10 विकेटने विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे.
या सामन्यात विंडिजने भारताला विजयासाठी दिलेल्या 72 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉने विजयी धाव घेत भारताचा विजय निश्चित केला. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
पृथ्वीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन कसोटी सामने खेळताना 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो ही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वेच्च सरासरी असणारा फलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरी ही अत्तापर्यंत फक्त अँडी गँतेयूम या विंडीजच्या माजी फलंदाजांच्या नावावर होती. पण आता त्यात पृथ्वीचाही समावेश झाला आहे.
यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आॅस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन हे तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 52 कसोटी सामने खेळताना 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या आहेत.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे अँडी गँतेयूम यांनी फक्त कारकिर्दीत एकच कसोटी सामना खेळला आहे. तो त्यांनी इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी 1948 मध्ये खेळला होता. यात त्यांनी 112 धावा केल्या होत्या.
पृथ्वीने 4 आॅक्टोबर 2018 ला विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने या पदार्पणाच्या सामन्यातच 134 धावांची शतकी खेळी केली. तर विंडिज विरुद्ध आज (12 आॅक्टोबर) पार पडलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 70 तर दुसऱ्या डावात नाबाद 33 धावांची खेळी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी असणारे फलंदाज-
118.50 – पृथ्वी शॉ
112.00 – अँडी गँतेयूम
99.94 – ़डॉन ब्रॅडमन
महत्वाच्या बातम्या-
- पृथ्वी शाॅने घातली आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी
- उरणला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, जाणून घ्या सर्व काही..
- तिसऱ्या दिवशी हैद्राबाद कसोटी जिंकत भारताचा विंडिजला व्हाईटवॉश