भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिक याने त्याच्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेटच्या दिग्गजांना आणि चाहत्यांना चकीत केले आहे. त्याने मंगळवारी (10 जानेवारी) गुवाहाटीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 156 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय ठरला. याआधी त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्येही (155 किमी प्रतितास) हा विक्रम केला आहे. गुवाहाटीच्या सामन्यात त्याने स्वत:चाच विक्रम मोडला, मात्र यामुळे एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
झाले असे की, सामना सुरू असताना हिंदी आणि इंग्लिंश ब्रॉडकास्टरने उमरानच्या चेंडूची गती वेगवेगळी दाखवली, यामुळे त्याला 156 किमी प्रतितास अशा सर्वाधिक वेगाने चेंडू टाकला याचे श्रेय मिळणार नाही, असे म्हटले जात आहे. त्याने हा चेंडू श्रीलंकेच्या डावातील 14व्या षटकात टाकला होता. ते त्याचे दुसरे षटक होते. त्यावेळी त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूचा वेग इंग्लिश ब्रॉडकास्टरने 145.7 किमी प्रतितास, तर हिंदीने थोड्यावेळानंतर संपूर्ण षटकातील चेंडूची गती दाखवली. त्यातील एक चेंडू 156 किमी प्रतितास दाखवला. हा गोंधळ पाहता त्याच्या चेंडूचा वेग नेमका किती होता, यावर चर्चा सुरू झाली आहे.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1613001129578868736?s=20&t=UF9zk6JOTPfwTeNIK3AbIA
जरी हा वेग उमरानच्या नावावर नोंदवला गेला नाही तरी तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज हा विक्रम कायम राहणार आहे. या सामन्यात वेगाबरोबरच प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 57 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1613001595717062658?s=20&t=rPZAu6iYGJrnkqDoIAnOcA
“मला केवळ चांगली गोलंदाजी करण्यावर भर द्यायचा आहे. मी आतापर्यंत केवळ 6 सामने खेळलो आहेत. श्रीलंकेविरुद्ध शमी, सिराज यांनीही मला मदत केली,” असे उमरान म्हणाला. या सामन्यात त्याने पथुम निसांका (72), चरिथ असालंका (23) आणि दुनिथ वेलालागे (0) यांना बाद केले.
उमरान भारताकडून वनडे, आंतरराष्ट्रीय टी20 आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच नाद! ‘त्रिशतकवीर’ पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, केले अनेक रेकॉर्ड्स
द्रविड@50: पहिल्याच आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा ‘मिस्टर डिपेंडेबल’