भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाईल. फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीसाठी मँचेस्टरचे मैदान भाग्यवान ठरू शकते. कोहलीने येथे तीन एकदिवसीय सामने खेळले असून त्याचा विक्रमही जबरदस्त आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवारी (१९ जुलै) इंग्लंडविरुद्ध तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना १० गडी राखून जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना १०० धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय संघाला तिसरा एकदिवसीय आणि मालिका जिंकायची असेल, तर विराट कोहलीची चांगली फलंदाजी आवश्यक आहे.
विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर सपशेल अपयशी ठरला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा कोहलीच्या फॉर्मचीच अधिक चर्चा होत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ११ धावा आणि दुसऱ्या वनडेत फक्त १६ धावा करून कोहली बाद झाला. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली मँचेस्टरच्या मैदानावर गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवू शकतो.
या मैदानावर विराट कोहलीचे २०१९ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात तीन सामने झाले होते. त्याने पाकिस्तानविरुद्ध ७७ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ७२ धावांची खेळी केली. मात्र, विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मात्र तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता.
दरम्यान, या मँचेस्टरच्या मैदानावरील भारतीय संघाचा इतिहास पाहिल्यास येथील आठवणी दु:खदायक असलल्याचे जाणवते. २०१९च्या विश्वचषकातून भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभव पत्कारून बाहेर पडला तो सामना देखील याच मैदानावर खेळला गेला होता. त्या संपूर्ण स्पर्धेत ५ शतके झळळकावणारा रोहित शर्मा आणि त्याच्या सह विराट कोहली आणि के एल राहुल हे सामन्याच्या सुरुवातीला बाद झाले होते. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे १७ जुललै रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ या मैदानावरील वाईट आठवणी पुसून टाकण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध आऊट, लॉर्ड इन?, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये होणार महत्वाचे बदल
लक्ष्मण ‘बॅक टू वर्क’! एनसीएच्या नव्या बॅचला दिले क्रिकेटचे धडे
लंडनमध्येच विराट घालवणार महिनाभर सुट्टी! कुटुंबातील ‘त्या’ महत्त्वाच्या सदस्याला घेतले बोलावून






