---Advertisement---

षटकार खेचत रोहित बनला वनडेतील 10 हजारी मनसबदार, सचिनचा विक्रम मोडला

On: मंगळवार, सप्टेंबर 12, 2023 3:41 PM
Rohit-Sharma-ODI
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील चौथ्या सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध रोहितने खास पराक्रम गाजवला आहे. सामन्यात 23 धावांचा टप्पा पार करताच वनडे कारकीर्दीत रोहित शर्मा 10000 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, हा पराक्रम त्याने षटकार मारून पूर्ण केला. तो अशी कामगिरी करणारा भारताचा सहावा खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडीत काढला.

रोहित शर्माचा विक्रम
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत खास फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) मैदानावर उतरले होते. दरम्यान रोहितने डावातील कसुन रजिथा टाकत असलेल्या सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर खणखणीत खषटकार खेचला आणि 23 धावा पूर्ण केल्या. या धावा पूर्ण करताच त्याने वनडे कारकीर्दीतील 10000 धावांचा टप्पा पार केला. यावेळी रोहितने 49 च्या सरासरीने आणि 90च्या स्ट्राईक रेटने ही कामगिरी केली. तो अशी कामगिरी करणारा भारताचा सहावा फलंदाज ठरला.

विशेष म्हणजे, रोहित शर्मा वेगवान 10000 धावा करणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 241 डावांमध्ये वनडेत 10000 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. सचिनने वनडेत 10000 धावा करण्यासाठी 259 डाव खेळले होते. यादीत अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 205 डावांमध्ये 10000 धावा केल्या होत्या.

वनडेत 10000 धावा करणारे भारतीय फलंदाज
18426 – सचिन तेंडुलकर
13024 – विराट कोहली
11363 – सौरव गांगुली
10889 – राहुल द्रविड
10773 – एमएस धोनी
10001 – रोहित शर्मा*

विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटमध्ये एकूण 15 खेळाडूंनी 10000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये विराट कोहली (57.63) आणि  एमएस धोनी (50.57) यांच्याव्यतिरिक्त फक्त रोहित शर्मा (49.14) याची सरासरी सर्वात चांगली आहे. (hitman Rohit Sharma becomes the sixth Indian batter to cross the 10000 runs mark in ODIs)

हेही वाचा-
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---