भारत विरुद्ध श्रीलंका संघात आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. खास बाब अशी की, हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी खूपच खास असणार आहे. कारण, रोहित या सामन्यात एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर करणार आहे. चला तर, रोहित नेमका काय विक्रम करणार आहे, हे जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) सुपर- 4 (Super- 4) फेरीतील चौथ्या सामन्यात दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. आता आशिया चषक अंतिम सामन्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. कारण, श्रीलंकेकडून भारताला कठीण आव्हान मिळणार आहे. सुपर- 4 फेरीत ज्याप्रकारे भारताला 213 धावांवर रोखले होते, तो भारतासाठी एक धडाच ठरला होता. पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यातही सर्वबाद झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले होते.
रोहितचा विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आशिया चषक अंतिम सामन्यात खास विक्रम करणार आहे. वनडे कारकीर्दीत आतापर्यंत 249 सामने खेळणाऱ्या रोहित शर्माचा 250वा सामना (Rohit Sharma’s 250th ODI Match) असणार आहे. कोणत्याही संघाकडून हा मैलाचा दगड पार करणे ही एक मोठी कामगिरी आहे.
रोहित शर्मा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात उतरताच 250 वनडे सामन्याचा आकडा गाठेल. भारतीय संघाच्या कर्णधाराला हा विक्रम करण्यापासून फक्त पाऊसच थांबवू शकतो. सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. जर सामना रद्द झाला, तर रोहितला प्रतीक्षा करावी लागेल. कारण, सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला राखीव दिवशी खेळला जाईल.
रोहितची आतापर्यंतची वनडे कारकीर्द
रोहित शर्मा याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 249 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 48.69च्या सरासरीने 10031 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या नावावर वनडेत 3 द्विशतकांचीही नोंद आहे. हा एक विश्वविक्रम आहे. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही 264 इतकी आहे. (Hitman rohit sharma will complete 250th odi match in asia cup final 17th september)
हेही वाचा-
रियान परागचा मोठा खुलासा! म्हणाला, ‘विराट कोहलीचा शेवटचा संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला, कारण…’
रोहितने संघाबाहेर केलेल्या खेळाडूंना घेऊन दिग्गजाने निवडली Playing 11, Asia Cup Finalपूर्वी बातमी वाचाच