Chris Jordan 17 ball fifty: बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेतील 9वा सामना पर्थ येथील पर्थ स्टेडिअमवर रंगलेला. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध होबार्ट हरिकेन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात हरिकेन्स संघाच्या स्टार खेळाडू ख्रिस जॉर्डन याने इतिहास घडवला. त्याने ठोकलेले अर्धशतक स्पर्धेच्या इतिहासातील चौथे वेगवान अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे, हा पराक्रम त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केला आहे.
संघासाठी सर्वाधिक धावा
झाले असे की, या सामन्यात होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी होबार्टने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. होबार्टला ही धावसंख्या गाठून देण्यात ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) आणि निखिल चौधरी (Nikhil Chaudhary) या दोघांचा सिंहाचा वाटा राहिला. निखिलने 31 चेंडूत 40 धावा केल्या, तर ख्रिस जॉर्डन याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अवघ्या 20 चेंडूत 295च्या स्ट्राईक रेटने 59 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
ख्रिस जॉर्डनचे संयुक्तरीत्या चौथे वेगवान अर्धशतक
जॉर्डनने यादरम्यान फक्त 17 चेंडूत चौथे वेगवान अर्धशतक (Chris Jordan fourth fastest fifty) केले. हे अर्धशतक करताना त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पडला. हे अर्धशतक करताच तो बीबीएल (BBL) इतिहासातील संयुक्तरीत्या चौथे वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू बनला. बीबीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने 2016मध्ये अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच, दुसऱ्या स्थानी डॅनियल ख्रिस्टियन असून त्याने 15 चेंडूत, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या टॉम बँटन याने 16 चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच, बेन कटिंग, निकोलस पूरन आणि ख्रिस जॉर्डन हे तिन्ही खेळाडू संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी असून त्यांनी 17 चेंडूत अर्धशतक केले आहे.
That was INSANE from @CJordan! 😱 #BBL13 pic.twitter.com/WdlAqqoQxO
— KFC Big Bash League (@BBL) December 20, 2023
बीबीएलमध्ये वेगवान अर्धशतक करणारे फलंदाज
12 चेंडू- ख्रिस गेल
15 चेंडू- डॅनियल ख्रिस्टियन
16 चेंडू- टॉम बँटन
17 चेंडू- बेन कटिंग, निकोलस पूरन आणि ख्रिस जॉर्डन*
जेसन बेहरेनडॉर्फ चमकला
होबार्टच्या डावात गोलंदाजी करताना पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) संघाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ चमकला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 25 धावा खर्चत सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अँड्र्यू टायने 2, तर लान्स मॉरिस आणि ऍश्टन एगर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Hobart Hurricanes Chris Jordan smashes 17 ball fifty against Perth Scorchers joint-fourth fastest in BBL history)
हेही वाचा-
ICC Ranking । शुबमन गिलला पछाडत बाबर पुन्हा पहिल्या स्थानी! जाणून घ्या सूर्यकुमार आणि बिश्नोईची रँकिंग
टीम इंडियाच्या तारणहाराचा भाऊ IPL मध्ये Unsold, बेस प्राईजलाही कुणीच घेतलं नाही संघात