इंडोनेशियामध्ये सध्या हॉकी एशिया कप खेळला जात आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत यजमान इंडोनेशिया संघाला १६-० अशा मोठ्या अंतराने पराभूत केले. याचसोबत भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम चार संघांमध्ये स्थान पक्के केले आहे. भारताने हा सामना जिंकल्यामुळे पाकिस्तानचा हॉकी संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बाद फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची आवश्यकता होती, जो त्यांनी इंडोनेशियाविरुद्ध मिळवला देखील.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही हॉकी संघ गुणतालिकेत जपाननंतर चार-चार गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. पण भारताचे गोलमधील अंतर चांगले असल्यामुळे सुपर ४ मध्ये जागा मिळवली. इंडोनेशियाला मोठ्या अंतराने पराभूत केल्यानंतर संघाने पहिल्या चार संघाच्या यादीत स्थान मिळवले. ही आठवी वेळ आहे जेव्हा भारतीय संघ अंतिम चार संघांमध्ये सहभागी झाला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिला सामना अनिर्णीत आणि दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर अंतिम चार संघात पोहोचण्यासाठी भारताला इंडोनेशियाला १५-० किंवा त्यापेक्षा मोठ्या अंतराने हरवणे गरजेचे होते. गतविजेत्या भारतीय संघासाठी इंडोनेशियाविरुद्ध दिप्सन टिर्कीने पाच, तर सुदेव बेलिमागाने तीन गोल केले. भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा अंतिम चार संघांमध्ये पोहोचला आहे. एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीन-तीन विजेतेपद पटकावले आहेत. सर्वात जास्त विजेतेपद दक्षिण कोरियाकडे आहेत. त्यांन चार वेळा एशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे.
या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यापासून वर्चस्व प्रस्थापित केले. सामन्यात भारताने ३६ वेळा गोलवर निशाणा साधला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारत ३-० ने आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये संघाने ६-० ने आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ही आघाडी १०-० अशी झाली. शेवटी १६-० अशा अंतराने भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघासाठी दिप्सन तिर्की सर्वात जास्त गोल केले. त्याने ४१, ४६, ५८ आणि ५८ व्या मिनिटाला संघासाठी गोल केले.
Magnificent game for #MenInBlue as they mark a big win against Indonesia at the Hero Asia Cup 2022 to qualify for the Super 4s of the Hero Asia Cup 2022!😍#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #MatchDay #INDvsINA @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/TJOEixswSk
— Hockey India (@TheHockeyIndia) May 26, 2022
या विजयानंतर भारताने २०२३ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकावर परिणाम टाकला आहे. भारताने विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे, तर पाकिस्तान संघ मात्र बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केले नव्हते. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध १-१ असा अनिर्णीत झाला होता. तर दुसरा सामना जापानविरुद्ध ५-२ अशा अंतराने गमावला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट
‘नशीब चांगलं नव्हतं, पण…’, लखनऊ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर गंभीरचा चाहत्यांना खास संदेश
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र