भारतीय हॉकी संघटनेने आज पुरूषांच्या आणि महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या आणि सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
याआधी मारीजने हे पुरूष संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र 2018च्या राष्ट्रकूल स्पर्धेतील भारतीय पुरूषांच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय हॉकी त्यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवायचे की नाही याबाबत संभ्रमात होती.
हरेंद्र सिंग यांनी ज्युनियर पुरुष हॉकी संघांचे 2016च्या लखनऊमध्ये झालेल्या उत्तर प्रदेश ज्युनिअर हॉकी विश्वचषकात प्रशिक्षकपद भूषविले होते. तसेच 2017 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत महिला हॉकी संघ चौथ्या स्थानावर होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जपानमध्ये झालेल्या 9व्या महिला आशिया चषक स्पर्धेत महिला संघाचे त्यांनी प्रशिक्षण केले होते.
हरेंद्र सिंग आणि सुजर्ड मारीजने यांनी आपल्या नवीन भूमिकेवर समाधान व्यक्त केले आहे.
” मी महिला संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे. गेल्या सहा महिन्यांत संघाने प्रदर्शित केलेल्या चांगल्या फॉर्मवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आहे. 2018 च्या विजेते महिला हॉकी वर्ल्डकपच्या तयारीवर भरपूर मेहनत घेणार आहोत,” असे सुजर्ड मारीजने म्हणाले.
हरेंद्र सिंग म्हणाले, ” भारतीय पुरुष हॉकी संघाचे व्यवस्थापन करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. भारतीय महिला हॉकी संघासोबत अतिशय समाधानकारक प्रवास झाला आहे. तसेच महत्त्वाच्या हंगामासाठी भारतीय हॉकीने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी भारतीय हॉकीचेआभार मानतो.”