औरंगाबाद। भारतीय खेळ प्राधिकरणच्या मैदानावर सुरु असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत आपल्या दमदार खेळाच्या जोरावर हॉकी ओडिशा नॉकआऊट फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. घरच्या मैदानावर सातत्याने पराभवाचा झटका सोसणाऱ्या महाराष्ट्राने मात्र गुरुवारी (21 फेब्रुवारी) स्पर्धेतील पहिला विजय साकारला.
गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये तीन हॉकीपटुंनी ठोकलेल्या गोलच्या हॅट्रीकने सर्वांचे मन जिंकले. त्यात नबीन कुंजूर (एसपीएसबी 4 गोल), आमिद खान (हॉकी महाराष्ट्र) आणि वाशू देव (हिमाचल हॉकी) यांचा समावेश आहे.
ड गटात ओडिशाचा डंका
ड गटातील सामन्यात हॉकी ओडिशासाठी भिमा एक्काने 14 व्या मिनीटांत गोल केला आणि हाच गोल निर्णायक ठरला. अत्तापर्यंत स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या भारतीय खेळ प्राधिकरण (साई) च्या संघाला ओडिशाने 1-0 ने नमवले. ते साच गुणांसह या गटात अव्व्ल तर 6 गुणांसह साई द्वितीय आहे.
याच गटात स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डच्या नबीन कुंजूरने (9, 27,35, 59 मि.,) चार गोल केले. त्यात एका हॅट्रीकचा समावेश असुन त्यांनी पंजाप आणि सिंध बॅंक लिमिटेड संघाला 4-2 च्या फरकाने धूळ चारली आणि स्पर्धेतील पहिला विजय पटकावला. पंजाब ऍण्ड सिंध संघातर्फे हरकंवलबीर सिंग (3 मि.,) आणि अंगदबीर सिंग (11 मि.,) यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. एसपीएसबी या विजयासग चार गुण घेऊन गटात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
हॉकी महाराष्ट्राने पटकावला पहिला विजय
क गटात सलग तीन पराभव स्विकारणाऱ्या हॉकी महाराष्ट्र संघाला यंदाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील पहिला विजय साकारता आला. गुरुवारी (21 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने हॉकी कनार्टक संघाला 4-2 च्या फरकाने विजय मिळवला. आमिद खानने केलेल्या दणदणीत कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने आपल्या गुणांचे खाते उघडले आहे.
आमिद खानने 11 व्या मिनीटात पगिला गोल करुन महाराष्ट्राला आघाडी मिळवुन दिली. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने आपला करिष्मा दाखवत 50 व्या आणि 49 व्या मिनीटात गोल करुन महाराष्ट्राला आधाडी मिळवुन दिली. प्रज्वल मोहरकरने 56 व्या मिनीटात ही आघाडी 4-2 वर नेऊन पोहाचवली. कर्नाटकच्या एन. एम सुर्याने 41 व्या तर व्ही. सुरेशने 59 व्या मिनीटात गोल करुन महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
हॉकी झारखंड विजयी, मुंबई तिसऱ्यांदा पराभुत
द मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या संघाला यंदाच्या ज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी सलग तिसरा पराभव स्विकारावा लागला. त्यांना ब गटातील साखळी फेरीत हॉकी झारखंडने 4-0 च्या फरकाने जोरदार पटकी दिली. सुश्रान डोड्रे (16 मि., 43 मि.,) याच्यासह दिपक सोरेंग (44 मि.,) आणि सम्राट कुंजुर (23 मि.,) यांनी गोल केला.
हॉकी झारखंड सहा गुणांसह या गटात तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर कोण जाणार याचा फैसला हा शुक्रवारी (22 फेब्रुवारी) ला होणाऱ्या मणिपुर हॉकी, मध्यप्रदेश हॉकी अकादमी दरम्यानच्या लढतीवर अवलंबुन आहे.
वाशूच्या हॅट्रीकने दिले हिमाचलला यश
अ गटात 3-0 च्या मोठ्या आघाडीने विजयाकडे वाटचाल करणाऱ्या सर्व्हीसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) संघाला हिमचलच्या वाशू देवने हॅट्रीक गोलचा जोरदार ताडाखा देत आपल्या संघासाठी विजय खेचुन आणला. त्याने 53, 56 आणि 58 व्या मिनीटांत गोल करुन सामना फिरवला. तत्पुर्वी मनिप करकेट्टा (18 मि.,) राहूल राजभर (20 मि.,) मनजित (21 मि.,) यांनी एसएससीबीसाठी गोल केले तर, 35 व्या मिनीटात चरणजित सिंगने हिमाचलसाठी गोलचे खाते उघडले होते. चार गुणांसह हॉकी हिमाचल गटातील चौथ्या स्थानावर आहे. हॉकी पंजाब तिसऱ्या स्थानावर आहे. एसएससीबी या गटातुन बाद होणारा पहिला संघ ठरला आहे.
निकाल:
गट अ: हॉकी हिमाचल : 4 (चरणजित सिंग 35 मि., वाशू देव 53, 56, 58 मि.) वि. वि. एसएससीबी : 3 (मनिप करकेट्टा 18 मि., राहुल राजभर 20 मि., मनजित 21 मि.) हाफ टाईम 3-0
गट ब : हॉकी झारखंड : 4 (सुश्रान डोड्रे 16, 43 मि., सम्राट कुंजूर 23 मि., दिपर सोरेंग 23 मि., दिपक सोरेंग 44 मि.) वि. वि. द मुंबई हॉकी आसोसिएशन लि. : 0. हाफटाईम 2-0
गट क : हॉकी महाराष्ट्र : 4 (अमिद खान 11, 50, 49 मि., प्रज्वल मोहरकर 56 मि.) वि. वि. हॉकी कर्नाटक : 2 (एन.एम सुर्या 41 मि., व्ही सुरेश 59 मि.)
गट ड : हॉकी ओडिशा : 1 (भिमा एक्का 14 मि.) वि. वि भारतीय खेळ प्राधिकरण (साई): 0 हाफ टाईम 1-0
गट ड : स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड : 3 (नबीन कुंजूर 9, 27, 35 मि,.) वि. वि. पंजाब ऍण्ड सिंध बॅंक : 2 (हरकंवलबीर सिंग 3 मि., अंगदबीर सिंग 11 मि,.) हाफ टाईम : 2-2
शुक्रवारचे सामने
गट अ : हॉकी पंजाब वि. हॉकी हिमाचल (सकाळी सात)
गट अ : हॉकी चंडीगड वि. हॉकी युनीट ऑफ तामिळनाडू (सकाळा साडेआठ)
गट ब : हॉकी हरियाणा वि. द मुंबई हॉकी असोसिएशन लि. (सकाळी दहा)
गट क : हॉकी गंगपूर ओडिशा वि. हॉकी कर्नाटका (दुपारी एक)
गट क : उत्तरप्रदेश हॉकी वि. दिल्ली हॉकी (दुपारी अडिच)
गट ड : पंजाब ऍण्ड सिंध बॅंक लि. वि. हॉकी बिहार (सायंकाळी चार)