---Advertisement---

महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे

On: रविवार, जुलै 1, 2018 12:21 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | जुलै महिन्यात इंग्लंड येथे होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे देण्यात आले आहे.

तर उपकर्णधारपदी गोलरक्षक सविताची  निवड झाली आहे.

या विश्वचषकासाठी भारतीय संघाची शुक्रवार, २९ जून रोजी हॉकी इंडियाने निवड केली.

२१ जूलैपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकात भारतीय संघ ब गटात असेल. भारताबरोबरच या गटात यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आयर्लंड हे संघ असतील.

भारतीय संघाच्या बचावफळीत सुनिता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, दीपिका, रीणा खोखर आणि ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर यांचा समावेश आहे.

मिड फिल्डमध्ये नमिता टोप्पो, लिमिली मिंझ, मोनिका, नेहा गोयल, नवजोत कौर आणि निक्की प्रधान किल्ला लढवतील.

आक्रमण फळीत कर्णधार राणी रामपालच्या जोडीला अनुभवी वंदना कटारिया, नवनीत कौर आणि उदिता असतील.

या संघ निवडी नंतर संघाचे प्रशिक्षक सोअर्ड मिर्जे यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

“आम्ही संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या स्पेन दौऱ्यातील कामगिरीमुळे विश्वाचषकासाठी आमचा आत्मविश्वास वाढला आहे.” भारतीय प्रशिक्षक सोअर्ड मिर्जे संघाच्या समतोला वर बोलताना म्हणाले.

“आम्हाला उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने यजमान इंग्लंड विरुद्धचा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आता आमचे पहिले लक्ष इंग्लंडला पराभूत करणे असेल.” असे सोअर्ड मिर्जे यांनी पत्रकारांना सांगितले.

असा असेल विश्वचषकासाठी भारतीय संघ

गोलरक्षक: सविता (उप कर्णधार), रजणी इतिमाप्रु.

बचावपटू: सुनिता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रीणा खोखर.

मिड फिल्डर: नमिता टोप्पो, लिलीमा मिंझ, मोनिका, नेहा गोयल, नवजोत कौर, निक्की प्रधान.

आक्रमणपटू: राणी रामपाल, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, उदिता.

महत्त्वाच्या बातम्या:

फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना

फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment