लंडन | महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व सामन्यात गुरुवारी (२ ऑगस्ट) भारताला आयर्लंडकडून ३-१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
या सामन्यात आयर्लंडने टाइब्रेकरवर भारतावर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
भारत-आयर्लंड यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मात्र पूर्ण वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले.
त्यानंतर झालेल्या टाइब्रेकरवर आयर्लंड ३-१ अशा फरकाने विजयी झाला.
आयर्लंडकडून टाइब्रेकरमध्ये रोजीन अॅप्टॉन, अॅलिसन मिक आणि कोएल वॅटकिन्स यांना गोल करण्यात यश आले.
टाइब्रेकरमध्ये आयर्लंडची गोलकीपर आएशा मॅक्फ्रेनने अविश्वसनीय कामगिरी करत भारताला फक्त एकच गोल करण्याची संधी दिली.
यामध्ये रीना खोखरला भारताकडून गोल करण्यात यश आले.
महिला हॉकी विश्वचषकात भारताची १९७८ नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी १९७८ च्या विश्वचषकात भारताला ७ व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज
–‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी