भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियानेआयर्लंडला 2-1 असे पराभूत केले. ब गटातील या पहिल्या सामन्यात आयर्लंडने ऑस्ट्रेलियाला चागंलीच टक्कर दिली.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोवर्स ब्लेक आणि ब्रॅंड टीम तर आयर्लंडकडून ओ डोनोग्यु शेन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
२८ वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या आयर्लंडने सामन्याच्या सुरूवातीपासून आक्रमक सुरूवात केली. पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियाचा गोलकिपर चार्टर अॅंड्र्यूने त्यांचे दोन हल्ले परतवून लावले.
या सामन्याच्या पहिल्याच सत्रात दोन गोल झाले होते. ब्लेकने 11व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. मात्र नंतर दोन मिनिटांच्या फरकाने आयर्लंडच्या शेनने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
1990नंतर प्रथमच विश्वचषकात खेळणाऱ्या आयर्लंडचा हा 1978नंतर पहिलाच गोल ठरला.
दुसऱ्या सत्रातही आयर्लंडने उत्तम खेळ करत ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी दिली नाही. तिसरे सत्र सुरू झाले असता ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅंड टीमने बचावात्मक खेेळ केला. त्याने 34व्या मिनिटाला वेयर कोरीने केलेल्या पासवर गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असणाऱ्या आयर्लंडने तीन वेळेचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला शेवटपर्यंत उत्तम लढत दिली. त्यांचा कर्णधार आणि गोलकिपर हार्टे डेव्हिडने चांगली कामगिरी केली.
तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक असे 6 पेनल्टी कॉर्नर मिळाले. अखेरपर्यंत चाललेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत स्पर्धेला विजयी सुरूवात केली. तसेच टीम हा सामन्याचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीची खेळातील परिपूर्णता मोनालिसाच्या पेंटीगसारखीच
–पृथ्वीच्या दुखापतीबरोबरच या गोष्टीमुळेही टीम इंडिया टेन्शनमध्ये
–कर्णधार कोहलीच्या या कृतीमुळे चाहते नाराज, ट्विटरवरुन सुनावले खडेबोल