---Advertisement---

हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले

On: शुक्रवार, नोव्हेंबर 30, 2018 8:36 PM
---Advertisement---

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या सहाव्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध चीन हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.

या सामन्यात इंग्लंडकडून ग्लेगोर्ने मार्क आणि अॅन्सेल लिआम तर चीनकडून गुवो झियाओपिंग आणि  द्यू तलाके यांनी प्रत्येकी एक गोल केला.

नवख्या चीनने सामन्याला उत्तम सुरूवात केली. झियाओपिंगने 5व्या मिनिटालाच ऐतिहासिक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पहिले सत्र संपण्यास एक मिनिट बाकी असतानाच इंग्लंडच्या मार्कने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असणाऱ्या चीनने दुसऱ्या सत्रातही चिवट खेळ केला. यावेळी  इंग्लंडला या सामन्यातील तिसरी पेनल्टी कॉर्नर मिळाली मात्र टेलर ल्यूकने दिलेला पास मिडलटनकडून मुकला.

तसेच 37व्या मिनिटाला चीनचा गोलकिपर वांग कॅयुने इंग्लंडच्या कोंडोन डेव्हिडचा गोल अडवत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले.

शेवटच्या आणि निर्णायक सत्रात इंग्लंडच्या लिआमने 48व्या मिनिटाला गोल संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांच्या आनंदावर चीनच्या द्यू तलाकेने विरजण टाकले. त्याने सामना संपण्यास काही सेकंद बाकी असतानाच गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

इंग्लंडचे सामना जिंकण्याचे स्वप्न भंग करणारा द्यू तलाके हा या सामन्याचा नायक ठरला.

2014च्या विश्वचषकात चौथ्या स्थानावर राहिलेला इंग्लंड जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर असून त्यांचा पुढील सामना 4 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाशी आहे. तर याच दिवशी दुसरा सामना चीन विरुद्ध आयर्लंड असा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय

विराट कोहलीची खेळातील परिपूर्णता मोनालिसाच्या पेंटीगसारखीच

रमेश पोवारांची उचलबांगडी पक्की, बीसीसीआयने मागवले महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment